शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

बाजारपेठेत खरेदीसाठी तोबा गर्दी

By admin | Updated: October 24, 2014 05:21 IST

साडेतीन मुहूर्तांपैकी एक आणि दिवाळीतील सर्वांत महत्त्वाचा दिवस म्हणजे पाडवा. पाडव्याच्या खरेदीसाठी बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीने फुलल्या आहेत

पिंपरी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक आणि दिवाळीतील सर्वांत महत्त्वाचा दिवस म्हणजे पाडवा. पाडव्याच्या खरेदीसाठी बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीने फुलल्या आहेत. नागरिक इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, सोने दागिने, प्लॅट, घरे खरेदी अशा वस्तू खरेदी करीत आहेत. पाडव्याला नवीन वस्तु खरेदी करण्याला पसंती दिली जाते. इलेक्ट्रॉनिक वस्तुंच्या बाजारपेठत मोठ्या प्रमाणात उलाढाल दिसून येत आहे. टी.व्ही., फ्रीज, मोबाईल्स, ओव्हन, इस्त्री, पंखे, कॅमेरा आदी वस्तूंना मोठी मागणी आहे. तरूणाईची पसंती नवीन टेंड्रचे मोबाईलला आहे. वविध वस्तुंवर डिस्काऊंट देण्यात येत असल्यामुळे ग्राहकांचा खरेदीकडे कल वाढलेला दिसून येतो. यामुळेही बाजारपेठेतील गर्दी वाढली आहे. विविध मॉल्स, इलेक्ट्रॉनिेक शोरूम याचे प्रत्यंतर येते. सर्वात मोठा उत्साह वाहन खरेदीला दिसून आला. पाडव्याच्या मुहूर्तावर दुचाकी व चारचाकी वाहन खरेदी बुकींग मोठया प्रमाणावर झाली आहे. वाहन खरेदीवर डिस्काऊंट देखील देण्यात येत आहे. महिन्यापासून चारचाकी खरेदीसाठी ओढ सुरू आहे. चारचाकी खरेदीसाठी ५ लाखांपासून पुढे गुंतवणूक ग्राहक करत आहेत. दुचाकी विक्रेते नारायण दौंडकर यांनी सांगितले की, दुचाकी गाडयांची विक्री मोठ्या प्रमाणावर आहे. सर्वसामान्यांना परवडतील अशा दुचाकींची विक्री अधिक झाली आहे. चांगल्या सीसी व मायलेजच्या गाड्यानांही पसंती मिळाली आहे. दिवाळी ही नवीन कपडयाशिवाय होऊ शकत नाही. लहान मुलांपासून ते मोठया व्यक्तिपर्यंत कपडे खरेदीचा उत्साह जाणवत आहे. लहान मुलांच्या कपडयांमध्ये विविध प्रकारचे नवीन ट्रेंड बाजरातआहेत. मोदी ड्रेसला पसंती मिळत आहे. कांजीवरम, बनारसी, पैठणी, कॅटलॉग साडया, विविध प्रकारच्या फॅ न्सी सिल्कसाडयाना बाजारात मोठया प्रमाणावर मागणी आहे. विक्रेते निलेश कटारिया यांनी माहिती दिली की, दिवाळीत कपडे खरेदीचा मोठया प्रमाणात उत्साह आहे. (प्रतिनिधी)