शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

टपरीधारकांना मिळणार हक्काची जागा

By admin | Updated: June 13, 2014 05:25 IST

अ‍ॅड़ अशोक पवार व नगर परिषद सभागृहनेते प्रकाश धारिवाल यांना दिले़ टपरी पुनवर्सनच्या जागेबाबत आज संबंधित विभागाचे फाईलवर स्वाक्षऱ्या केल्या

शिरूर : टपरी पुनर्वसन व नगर परिषद प्रशासकीय इमारतीसाठी शासनातर्फे येत्या महिनाभरात नगर परिषदेकडे जागा हस्तांतरित करण्याचे आश्वासन विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी मुंबई येथे आमदार अ‍ॅड़ अशोक पवार व नगर परिषद सभागृहनेते प्रकाश धारिवाल यांना दिले़ टपरी पुनवर्सनच्या जागेबाबत आज संबंधित विभागाचे फाईलवर स्वाक्षऱ्या केल्या असून, महसूलमंत्र्यांच्या सहीनंतर जागा नगरपरिषदेकडे हस्तांतरित करण्यात येईल़ शहरातून जाणाऱ्या पुणे नगर-रस्त्यावरील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी व शहर टपरीमुक्त करण्याच्या हेतूने शहरातील ४५० टपऱ्यांचे अतिक्रमण मागील जूनमध्ये (२०१३) हटवण्यात आले होते़ टपऱ्या हटवल्यानंतर आमदार अ‍ॅड़ पवार व धारिवाल यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषद प्रशासनाने प्रशासकीय प्रक्रिया राबविली़यानंतर पवार व धारिवाल यांनी त्याचा वर्षभर नियमित पाठपुरावा केला़ आमदार पवार यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले़ याचा वर्षभरातच सकारात्मक परिणाम जाणवला़ काल (दि. ११) मुंबई येथे वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली़ आमदार पवार, सभागृहनेते धारिवाल यांच्यासह नगरसेवक जाकिरखान पठाण, विजय दुगड, शिक्षणमंडळ सदस्य संतोष शितोळे, मुख्याधिकारी डॉ़ विजयकुमार थोरात, नगरपरिषद अभियंता विवेक देशमुख तसेच संबंधित खात्यांचे सचिव, अधिकारी या बैठकीस उपस्थित होते़ या बैठकीत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर टपरी पुनर्वसनसाठी शिरूर बसस्थानका शेजारील ४९़९० गुंठे, प्रशासकीय इमारतीसाठी शासकीय वरिष्ठ मुलींच्या वसतिगृहाशेजारी ५९ गुंठे तर अग्निशामक केंद्रासाठी पाबळ रस्त्यावरील २९ गुंठे जागा ३० दिवसांत नगर परिषदेकडे हस्तांतर करण्याबाबत वळसे पाटील यांनी आमदार पवार व धारिवाल यांना आश्वासन दिले़ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार पवार व धारिवाल यांच्या मागणीनुसार नगर परिषद प्रशासकीय इमारतीसाठी पाच कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला असून, जागा ताब्यात मिळताच या कामांना सुरुवात करण्यात येणार आहे.टपरी पुनवर्सनांतर्गत नियोजित ठिकाणी दुकान केंद्राची उभारणी करण्यात येणार असून, त्याठिकाणी गरजुंना व्यवसायासाठी दुकाने मिळू शकणार आहेत. टपऱ्यांचे अतिक्रमण हटवल्यानंतर वर्षभरातच ही प्रक्रिया मार्गी लागल्याने टपरीधारकांसाठी ही आनंदाची बाब म्हणावी लागेल़ (वार्ताहर)