शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

थेट लढतींत होणार उमेदवारांची दमछाक

By admin | Updated: February 17, 2017 04:23 IST

जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीला आता पाच दिवस बाकी राहिले असताना सर्वच पक्षांमधील उमेदवारांची

राजगुरुनगर : जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीला आता पाच दिवस बाकी राहिले असताना सर्वच पक्षांमधील उमेदवारांची मतदारांपर्यंत पोहोचण्याची धावपळ सुरु आहे. त्यामध्ये ज्या गट व गणांमध्ये सरळ लढती आहेत तेथील उमेदवारांना विजयासाठी अधिक कष्ट घ्यावे लागणार आहेत. विजयासाठी होणाऱ्या मतदानापैकी पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळवावी लागणार असल्यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त खर्च करावा लागणार आहे.खेड तालुक्यामध्ये एका गटामध्ये तर तीन गणांमध्ये सरळ लढती आहेत. त्यामध्ये रेटवडी-पिंपळगावतर्फे खेड या गटामध्ये तर पिंपळगावतर्फे खेड, काळूस आणि नाणेकरवाडी या गणांमध्ये सरळ लढती आहेत. प्रत्येक गटाची मतदारसंख्या ४० हजार ते २१ हजाराच्या दरम्यान आहे. सर्वात कमी नाणेकरवाडी-महाळुंगे गटामध्ये २१४५४ मतदार आहेत. येथे चौरंगी लढत असून विजयी उमेदवारासाठी झालेल्या मतदानामध्ये तीस-ते चाळीस टक्के मतेही विजयासाठी पुरेशी आहेत. मात्र दुरंगी लढत असलेल्या रेटवडी-पिंपळगाव तर्फे खेड या गटामध्ये सर्वात जास्त ४१,१८२ मतदार आहेत. येथे सरासरी सत्तर टक्के मतदान (२९ ते ३० हजार) जरी झाले तरी विजयासाठी उमेदवाराला कमीतकमी १५ ते १६ हजार मते मिळवावी लागणार आहेत. तेच नाणेकरवाडी-महाळुंगे गटामध्ये ८० टक्के (१६ ते १७ हजार) मतदान झाले तरी तेथे चौरंगी लढतीमुळे विजयासाठी आठ हजार मतेही पुरेशी ठरु शकतात. त्या खालोखाल सांडभोरवाडी-काळूस गणामध्ये ३९,८१८ मतदार आहेत. येथेही तिरंगी लढत असली तरी दोन तुल्यबळ उमेदवारांमध्ये कडवी लढत आहे. त्यामुळे येथेही विजयी उमेदवाराला झालेल्या मतदानाच्या ४५-५० टक्के मतदान घ्यावे लागणार आहे.