शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

बंधाऱ्याचे काम अडचणीत

By admin | Updated: June 4, 2016 00:27 IST

प्रयागधाम व कोरेगाव मूळ (ता. हवेली) या दोन गावांच्या शिवेवर प्रस्तावित असलेला सिमेंट बंधारा मागील सहा महिन्यांपासून वन खात्याच्या तालुकापातळीवरील अधिकाऱ्याच्या आडमुठेपणामुळे प्रलंबित आहे.

उरुळी कांचन : प्रयागधाम व कोरेगाव मूळ (ता. हवेली) या दोन गावांच्या शिवेवर प्रस्तावित असलेला सिमेंट बंधारा मागील सहा महिन्यांपासून वन खात्याच्या तालुकापातळीवरील अधिकाऱ्याच्या आडमुठेपणामुळे प्रलंबित आहे. कोरेगाव मूळ, प्रयागधाम व नायगाव या तिन्ही गावांच्या परिसरातील ग्रामस्थांच्या पिण्याच्या व जनावरांसाठीच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून जिल्हा परिषदेच्या छोटे पाटबंधारे विभागाच्या वतीने आणि जिल्हा परिषदेचे तत्कालीन उपाध्यक्ष व विद्यमान अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या शिफारशीतून या तीन गावांमध्ये दोन बंधाऱ्यांना मंजुरी देऊन त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी कोरेगाव मूळ येथील बंधाऱ्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र, प्रयागधाम सर्वोपचार रुग्णालयाच्या बाजूला वनखात्याच्या राखीव वनक्षेत्र गट ५६८ मध्ये संयुक्त वनव्यवस्थापन समिती कोरेगाव मूळ यांच्यामार्फत वनबंधारा बांधण्याचा ठराव मंजूर झाला आहे. यासाठी ५६८ गटामधील २ हेक्टरपेक्षाही कमी क्षेत्र वापरले जाणार असल्याने आणि या बंधाऱ्यातील पाण्याचा उपयोग या वनक्षेत्रामध्ये राहणाऱ्या वन्यप्राणी व पशुपक्षी यांना होणार असल्याने तत्कालीन तालुका वन परिक्षेत्र अधिकारी यांनी ना हरकत दाखला दिलेला होता. प्रशासनाने या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून वैष्णवी कन्स्ट्रक्शन या फर्मला हे काम मंजूर करण्यात आले. या फर्मने प्रत्यक्षात काम चालू केल्यानंतर वनखात्याच्या नव्याने आलेल्या अधिकाऱ्याच्या अडवणुकीमुळे काम लगेच बंद करण्यात आले. त्यानंतर आतापर्यंत हे काम बंद असल्याने या भागात अडचणीच्या व तीव्र दुष्काळाच्या काळात होणारी पाण्याची सोय होऊ शकली नाही. याला कारण केवळ तालुका वन अधिकारी व जिल्हा परिषदेच्या छोटे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांमधील नसलेला समन्वय होय! शासन एकीकडे जलयुक्त शिवार योजनेच्या कामांना प्राधान्य देत असताना त्याच शासनाचे अधिकारी शासनाच्याच धोरणाला वाटाण्याच्या अक्षदा लावण्याचा प्रकार करतात म्हणजे नेमके काय? असा प्रश्न या भागातील जनतेला पडला आहे. (वार्ताहर)