शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला तीन वर्षे सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:11 IST

पुणे : घरात एकटीच असल्याचा फायदा घेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाला न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी व ५ हजार ...

पुणे : घरात एकटीच असल्याचा फायदा घेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाला न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांनी हा आदेश दिला. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त तीन महिने सक्त कारावास भोगावा लागेल, असेही आदेशात न्यायालयाने नमूद केले आहे.

संतोष अशोक शिंदे (वय ३५) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. ही घटना ७ नोव्हेंबर २०१८ रोजी वाकड परिसरात घडली. पीडिता ही घरी एकटीच होती. संतोष शिंदे हा त्यांच्या घरात शिरला. यावेळी, त्याने पीडितेचे केस धरून तिला मिठी मारत अश्लील वर्तन केल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले. याप्रकरणात, महिला पोलीस उपनिरीक्षक कविता रूपनर व नकुल न्यामाने यांनी तपास करून आरोपीविरोधात भारतीय दंड विधान कलम ३५४, सह लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम सन २०१२ चे कलम ७ सह ८ प्रमाणे गुन्हा केल्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.

याप्रकरणात सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी एकूण पाच साक्षीदार तपासले. आरोपी याने पिडितेशी यापुवीर्ही असेच वर्तन करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी, पीडित मुलीने व तिच्या आईने आरोपीच्या आईस त्याला समजावून सांगा, असे सांगितले होते. मात्र, त्यानंतरही आरोपीच्या वर्तनात काहीही फरक पडला नाही.

आरोपीस निर्दोष सोडल्यास पुन्हा असे कृत्य करण्याची शक्यता नाकारता येणार नाही म्हणून आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी ॲड. घोगरे-पाटील यांनी युक्तिवादादरम्यान केली. न्यायालयाने ती मान्य करत आरोपीस शिक्षा सुनावली. याप्रकरणात हिंजवडी पोलिस ठाण्याचे हवालदार दिपक गायकवाड यांनी न्यायालयीन कामकाजासाठी साहाय्य केले.