शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक बंदोबस्तासाठी तीन हजार पोलीस तैनात

By admin | Updated: February 20, 2017 02:57 IST

ऐन निवडणूक काळात ज्या भागात गुन्हेगारी घटना घडल्या. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये ज्या भागात संवेदनशील प्रभाग घोषित केले होते

पिंपरी : ऐन निवडणूक काळात ज्या भागात गुन्हेगारी घटना घडल्या. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये ज्या भागात संवेदनशील प्रभाग घोषित केले होते, अशा ठिकाणी, झोपडपट्टीनजीकच्या मतदान केंद्रावरील भोसरी, चिंचवड, निगडी, पिंपरी भागातील ६३ बूथवर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. बंदोबस्तासाठी तीन हजार पोलीस कर्मचारी सज्ज ठेवण्यात आले आहेत. एक पोलीस उपायुक्त, दोन सहायक पोलीस आयुक्त, २४ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह तीन हजार कर्मचारी अशी फौज तैनात आहे. त्याचबरोबर राज्य राखीव दलाच्या पोलिसांची जादा कुमक मागवली आहे, अशी माहिती परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली. निवडणूक शांततेत पार पडावी. कोणताही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. एक पोलीस उपायुक्त, दोन सहायक पोलीस आयुक्त, २४ पोलीस निरीक्षक, १६५ सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, २ हजार ४५१ पोलीस कर्मचारी, बूथसाठी १ हजार ६०८ कर्मचारी, १०० मीटरसाठी वेगळे ४६५, मतदान केंद्रातील पाचपेक्षा अधिक बूथवर ५०, सेक्टर पेट्रोलिंगसाठी १३५, वेगवेगळ्या पेट्रोलिंगसाठी १२५ कर्मचारी तैनात असतील. राज्य राखीव दलाचे २०० पोलीस शहरात  दाखल झाले आहेत. संवेदनशील बूथवर एक अधिकारी तैनात असणार आहे.(प्रतिनिधी)इलेक्शन वॉचसाठी ६०० कॅमेरे शहरात ६०० कॅमेरे आहेत. त्याचा वापर करणार आहोत. पुण्यातील मध्यवर्ती देखरेख कक्षाचीही मदत घेण्यात येणार आहे. प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय परिसरात राज्य राखीव दलाचे पोलीस तैनात असणार आहेत. सोमवारी पोलीस कर्मचारी निवडणूक अधिकाऱ्यांबरोबर निवडणूक निर्णय कार्यालय येथे जातील, असे नियोजन आहे.