शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

तीन जणांवर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा

By admin | Updated: May 29, 2016 03:44 IST

डॉ. डी. वाय. पाटील फार्महाऊस थेऊरच्या व्यवस्थापकास जातीवाचक शब्द वापरून, शिवीगाळ करून, हातपाय तोडण्याची धमकी दिल्याप्रकरणी थेऊर येथील तिघांवर अनुसूचित

लोणी काळभोर : डॉ. डी. वाय. पाटील फार्महाऊस थेऊरच्या व्यवस्थापकास जातीवाचक शब्द वापरून, शिवीगाळ करून, हातपाय तोडण्याची धमकी दिल्याप्रकरणी थेऊर येथील तिघांवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुजित सुदाम काकडे, दत्तात्रय कुंडलिक काकडे व किरण रामभाऊ काकडे (तिघेही रा. ग्रामपंचायत कार्यालयासमोर, थेऊर) अशी आरोपींची नावे आहेत. प्रकाश लहू कांबळे (वय ४९, रा. फ्लॅट क्रमांक ३४, सी विंग, तिसरा मजला, आकाशवाणी समोर, हडपसर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला.हा प्रकार २७ मे रोजी दुपारी ११.४५ वाजण्याच्या सुमारास घडला. प्रकाश कांबळे हे नेहमीप्रमाणे फार्महाऊसवर काम करीत होते. त्या वेळी तिघेजण तेथे आले व त्यांनी सुरक्षारक्षकास कांबळे यांना बाहेर बोलावून आणण्यास सांगितले. निरोप मिळाल्यानंतर कांबळे उदय भालचंद्र पाटील यांच्यासमवेत बाहेर आले. त्यावेळी हे तिघे फार्महाऊस समोर उभे होते. त्या वेळी सुजित व दत्तात्रय काकडे म्हणाले की, पाटील व आमचा जमिनीचा वाद होता, त्याबाबतचा निकाल कोर्टाने आमच्या बाजूने दिला असून, फार्महाऊसमधील आमच्या जागेत सुरू असलेले बांधकाम थांबवा. कांबळे यांनी मालक बाहेर गेले असून, ते आल्यानंतर तुमची भेट घडवून आणतो, चर्चा करा व काय असेल ते पाहून घ्या, असे सांगितले. कांबळे यांनी असे सांगताच सुजित काकडे हा त्यांच्या अंगावर धावून गेला व हाताने कानामागे व तोंडावर मारले. दत्तात्रय काकडे याने जागा ताबडतोब खाली करा नाही, तर तुमच्याकडे पाहतो, अशी धमकी दिली. यानंतर सुजित याने जातीवाचक शब्द वापरले. - मागील वेळेस काकडे व कांबळे यांच्या भांडणाच्या वेळी कांबळेकडे जसे बघितले तसे पाहतो व तू पोलिसांत तक्रार दिली, तर तू थेऊर फाट्यावर कसा येतोस हे पाहतो. तुझे हातपाय मोडतो, अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. उदय पाटील यांनी मध्यस्ती करून हे भांडण मिटवले. याप्रकरणी कोणासही अटक केली नाही.