शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी तिघांना बेड्या

By admin | Updated: March 21, 2017 05:37 IST

गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मेफेड्रोन आणि ब्राऊन शुगरच्या तस्करीप्रकरणी तिघांना बेड्या ठोकल्या असून, दोन वेगवेगळ्या

पुणे : गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मेफेड्रोन आणि ब्राऊन शुगरच्या तस्करीप्रकरणी तिघांना बेड्या ठोकल्या असून, दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये एकूण ४ लाख ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी दिली. नितीन सुभाष सूर्यवंशी (वय ३४, रा. दुर्गामाता कॉलनी, पिंपळे सौदागर, पिंपरी), गौरांग मनहरभाई शहा (वय ३४, रा. शांतीकुंज सोसायटी, बडोदा, गुजरात) या दोघांना मेफेड्रोनच्या तस्करीप्रकरणी अटक करण्यात आली आहे. नीरज अर्जुन टेकाळे (वय २४, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर) याला ब्राऊन शुगरच्या तस्करीप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सूर्यवंशी आणि त्याचा साथीदार शहा हे दोघेही मोटारीमधून बावधन येथील सूर्यदत्ता महाविद्यालयासमोर येणार असल्याची माहिती सहायक निरीक्षक अजय वाघमारे यांना मिळाली होती. त्यानुसार, सापळा रचून या दोघांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून ४ लाख २५ हजारांचे ८५ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे. आरोपींविरुद्ध हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर नीरज हा पाटील इस्टेटमध्ये छुप्या पद्धतीने ब्राऊन शुगरची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली होती. कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना पाहून तो पळून जाऊ लागला. त्याला पोलिसांनी पाठलाग करून पकडले. त्याच्याकडे ५६ हजारांचे ११ ग्रॅम ब्राऊन शुगर मिळून आले. त्याने हे ब्राऊन शुगर अलिशेर लालमहंमद सौदागर आणि अशोक भांबुरे (दोघेही रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर) यांच्याकडून घेतल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी याप्रकरणी तिघांविरुद्ध खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही कारवाया उपायुक्त दीपक साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ निरीक्षक प्रतिभा जोशी, पोलीस निरीक्षक स्वाती थोरात, सहायक निरीक्षक संजय ठेंगे, अजय वाघमारे, अविनाश शिंदे, ज्ञानदेव घनवट, प्रफुल्ल साबळे, अमित छडीदार, स्नेहल जाधव, विनायक जाधव, राकेश गुजर, व्ठ्ठिलल खिलारे, राजेंद्र बारशिंगे, सचिन चंदन यांच्या पथकाने केली. (प्रतिनिधी)