शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

एका रात्रीत झाले तीन खून

By admin | Updated: May 5, 2015 03:15 IST

एकाच रात्रीत खुनाच्या तब्बल तीन घटना घडल्या असून, रविवारची रात्र खुनाची रात्र ठरली. पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा

पुणे : एकाच रात्रीत खुनाच्या तब्बल तीन घटना घडल्या असून, रविवारची रात्र खुनाची रात्र ठरली. पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पोलीस झोपा काढत असताना शहरातील रस्त्यांवर मात्र राजरोसपणे खुनाच्या घटना घडत चालल्या आहेत. दत्तवाडी आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये या तीन घटना घडल्या आहेत.दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एकापाठोपाठ दोन खून झाले. रात्री दहाच्या सुमारास नितीन दत्तात्रय कसबे (वय २१, रा. अंबिल ओढा वसाहत, सिंहगड रस्ता) याचा पूर्ववैमनस्यातून खून करण्यात आला. याप्रकरणी चैत्या रंधवे, श्रावण बुरुंगले, काळ्या रंधवे यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अनिल दत्तात्रय कसबे (वय २६) यांनी फिर्याद दिली आहे. नितीन कसबे याच्यावर रविवारी रात्री दहा-साडेदहाच्या सुमारास आंबिल ओढा वसाहतीमधील माजी महापौर माऊली शिरवळकर यांच्या घराशेजारी हल्ला करण्यात आला. कसबे याला एकटे गाठून त्याच्यावर कोयता, सत्तूरसारख्या हत्यारांनी वार करुन निर्घृण खून करण्यात आला. आरोपींची नितीनसोबत जुनी भांडणे होती. आरोपी पूर्वी त्याच वस्तीमध्ये राहण्यास होते. सध्या आरोपी हडपसर भागात राहात आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता जाधव करीत आहेत.खुनाची दुसरी घटना राजाराम पुलाजवळील वरद विनायक गणपती मंदिरामागे असलेल्या जागेवर घडली. दत्तात्रय मोतीराम पवार (वय ५५, रा. हिंगणे खुर्द, सिंहगड रोड) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी गणेश मनोहर होळे (वय ३०, रा. दांडेकर पूल) याला अटक करण्यात आली आहे. रविवारी रात्री दहा ते साडेदहाच्या दरम्यान ही घटना घडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी निंबाळकर यांनी फिर्याद दिली आहे. पवार आणि होळे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. रविवारी रात्री होळे याने पवार यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पैसे द्यायला पवार यांनी नकार दिल्यामुळे चिडलेल्या होळेने त्यांच्या डोक्यात दगड घालून खून केला.तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह कालव्यात टाकून दिला. होळे याने पवार यांचा खून केल्याची माहिती स्वारगेट पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी संतोष क्षीरसागर यांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक निकम, राम राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या पथकाने होळे याला अटक केली.(प्रतिनिधी)