पुणे : सदनिकेचे कुलूप उचकटून चोरट्यांनी २ लाख ९४ हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना २० डिसेंबर ते २१ डिसेंबर या कालावधीदरम्यान धनकवडीमध्ये घडली. सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी नंदू चोरगे (वय २५, रा. धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे. चोरगे यांच्या घराचे कुलूप चोरट्यांनी उचकटून घरामध्ये प्रवेश केला. घरातील कपाटामध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले. (प्रतिनिधी)
धनकवडीमध्ये तीन लाखांची घरफोडी
By admin | Updated: December 23, 2016 01:12 IST