शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
5
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
6
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
7
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
10
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
11
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
12
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
13
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
14
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
15
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
16
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
17
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
18
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
19
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
20
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं

मुलाला मारण्याची धमकी देऊन महिलेचे दागिने लुबाडले

By admin | Updated: May 15, 2016 00:53 IST

चार वर्षांच्या मुलाला घेऊन वडिलांच्या घरी जात असलेल्या महिलेचा पाठलाग करीत पार्किंगमध्ये तिच्या मुलाला ताब्यात घेऊन मारण्याची धमकी देऊन अंगावरील दीड लाखांचे सोने चोरट्याने लंपास केले

पुणे : चार वर्षांच्या मुलाला घेऊन वडिलांच्या घरी जात असलेल्या महिलेचा पाठलाग करीत पार्किंगमध्ये तिच्या मुलाला ताब्यात घेऊन मारण्याची धमकी देऊन अंगावरील दीड लाखांचे सोने चोरट्याने लंपास केले. ही घटना शनिवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास मार्केट यार्ड येथील वर्धमानपुरा येथे घडली. पोलिसांना आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून, त्यावरून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. संगीता वस्तुपाल पालेशा (वय ३७, रा. गणेश पॅलेस सोसायटी, गुलटेकडी) यांनी फिर्याद दिली आहे. संगीता या पती वस्तुपाल, खेमचंद आणि दोन मुलांसह राहण्यास आहेत. त्यांच्या पतीचे रविवार पेठेमध्ये भांडी खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. तर, वडील ओंकारमल गुंदेचा हे मार्केट यार्डमधील गंगाधामजवळील वर्धमानपुरा सोसायटीमध्ये राहण्यास आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास संगीता त्यांचा मुलगा जैनिल (वय ४) याला घेऊन वडिलांच्या घरी जात होत्या. त्या वेळी साधारणपणे ४० वर्षीय व्यक्तीने त्यांच्या नकळत पाठलाग करायला सुरुवात केली. संगीता वर्धमानपुरा सोसायटीच्या मुख्य गेटमधून पार्किंगमध्ये आल्या. वडिलांच्या मालकीच्या सी १०३ या पार्किंगमध्ये गाडी पार्क करीत असताना पाठीमागून आलेल्या चोरट्याने त्यांच्याशेजारी दुचाकी लावली. झटकन खाली उतरून संगीता यांच्या मुलाला उचलून ताब्यात घेतले. ‘तुम्हारे पास क्या क्या है, सब निकाल के दो’ असे त्याने विचारताच संगीता यांनी घाबरून हातातील पाटल्या काढून दिल्या. त्यानंतरही त्याने ‘और क्या क्या है तुम्हारे पास’ असे विचारल्यावर त्यांनी काही नाही, असे सांगितले. त्याने जवळ येत संगीता यांच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावली. त्यानंतर जैनिलला सोडून देत स्वत:ची दुचाकी घेऊन तो पसार झाला. पोलिसांनी त्याचे वर्णन घेतले असून, आसपासच्या भागातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. हा चोरटा संगीता यांचा पाठलाग करीत असताना फुटेजमध्ये दिसत असून, पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.