शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

पितृत्वाच्या ओढीला हवाय मायेचा धागा

By admin | Updated: June 15, 2014 03:50 IST

प्रत्येक पुरुषात एक स्त्री आणि प्रत्येक स्त्रीत एक पुरुष असतो, असे म्हटले जाते, त्यामुळे एक पिता आईचीही भूमिका पार पाडू शकतो,

पुणे : प्रत्येक पुरुषात एक स्त्री आणि प्रत्येक स्त्रीत एक पुरुष असतो, असे म्हटले जाते, त्यामुळे एक पिता आईचीही भूमिका पार पाडू शकतो, या सकारात्मक विचारातून आपल्या एकाकी जीवनाच्या सफरीत तान्हुलं सोबती मिळविण्यात पुुरुषांचा पुढाकार वाढत आहे. बदलत्या काळात ‘सिंगल पॅरेंट’ ही संकल्पना वेगाने समोर येताना दिसत आहे. घटस्फोटित किंवा करिअरच्या मागे धावताना, काही जबाबदाऱ्यांमुळे विवाहाचा बंध नको वाटणाऱ्या स्त्री-पुरुषांना आयुष्याच्या एका टप्प्यावर सोबतीची गरज भासते. मात्र, ही ओढ जोडीदाराची नसून आपलं मूल असावं, अशी असते. अशाच या पालकत्वाच्या ओढीने एकटी स्त्री किंवा पुरुष मूल दत्तक घेतात. स्त्रीतील मातृत्वाची भावना ओळखून ‘सिंगल मदर्स’ तुलनेने अधिक आढळतात; परंतु एक पुरुषही उत्तम पिता व चांगली माता अशा दोन्ही भूमिका बजावू शकतो, असा विश्वास थोड्या प्रमाणात वाढत गेल्याने ‘सिंगल फादर’ही समोर येत आहेत. हे शहरातील अनाथालयांमध्ये एकट्या पुरुषांकडून मूल दत्तक घेण्याच्या मागणीवरून स्पष्ट होत आहे. पुण्यात अनाथ मुलांसाठी भारतीय समाजसेवा केंद्र काम करते. गेल्या काही वर्षांत या केंद्रात एकट्या पुरुषांकडून मूल दत्तक घेण्याची मागणी वाढल्याचे चित्र आहे. याबाबत या केंद्राच्या वर्षा भागवत म्हणाल्या, ‘मुलांना त्यांचा योग्यरीत्या सांभाळ करून सुरक्षित भविष्य देणाऱ्या पालकांची आवश्यकता असते. तशी मुलांची भावनिक गरज अनेक पालकांना असते, त्यामुळे मूल दत्तक देणे ही आनंददायी घटना असली तरी मुलाच्या भविष्याचा विचार करून चौफेर चौकशी करावीच लागते. दांपत्यापेक्षा एकट्या पालकाविषयी अधिक सतर्कता आम्ही बाळगतो. गेल्या काही वर्षांपूर्वी एकट्या महिलांकडूनच मुले दत्तक घेतली जात आणि संस्थाही देत. मात्र, काही वर्षांपासून हे चित्र बदलले असून एकटे पुरुषही मुलं दत्तक घेण्याची मागणी करत आहेत. अशा पुरुषांची पार्श्वभूमी, आर्थिक सुबत्ता, मूल सांभाळण्याची क्षमता आदी गोष्टी ध्यानात घेतल्या जातात. मगच मूल दत्तक दिले जाते; पण पुरुषांचा पुढाकार ही सकारात्मकच बाब आहे.’ (प्रतिनिधी)