शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

ऊसशेतीला धरणाचे पाणी नाही?

By admin | Updated: September 21, 2015 03:50 IST

धरणातील पाणी ऊस पिकास देऊ नये, अशी जलतज्ज्ञांनी शिफारस केली आहे. त्यावर शासन गांभीर्याने विचार करीत असल्याने आगामी काळात उसाला

इंदापूर : धरणातील पाणी ऊस पिकास देऊ नये, अशी जलतज्ज्ञांनी शिफारस केली आहे. त्यावर शासन गांभीर्याने विचार करीत असल्याने आगामी काळात उसाला धरणातून पाणी मिळण्याची शक्यता धूसर झाल्याचे संकेत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिले. कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या ३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या परिसरातील महात्मा फुले माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात ही सभा झाली. साखर कारखान्यांच्या चालू गळीत हंगामासंदर्भात मंत्री समितीची बैठक अद्याप झाली नाही. बैठक झाल्याशिवाय कारखाना सुरू करता येत नाही. जर सरकारच्या परवानगी शिवाय कारखाना सुरू केला तर सरकार एका दिवसाला ५ लाख रुपये दंड करणार आहे. त्यामुळे कारखानदारांपुढे समस्या निर्माण झाल्या आहेत. मात्र, सभासदांनी काळजी करण्याचे कारण नाही. कोणत्याही परिस्थितीत कारखाना आपण सुरूच करणार आहोत, असे पाटील म्हणाले. २०१५-१६ च्या गळीत हंगामाला शासनाने त्वरित परवानगी द्यावी. याबाबत ठराव या वेळी मंजूर करण्यात आला. तसेच ऊस गाळपासाठी कारखान्याला पाणी उचलण्याची परवानगी शासनाने द्यावी, असा ठरावही मंजूर करण्यात आला. सभेस सर्व संचालक, ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. कारखान्याच्या उपाध्यक्षा पद्मा भोसले यांनी प्रास्ताविक केले.