शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

खासगी शाळांतही गणवेश नाहीच

By admin | Updated: July 3, 2016 04:07 IST

पालकांनी ठराविक दुकानातूनच विद्यार्थ्यांसाठी गणवेश खरेदी करावी, अशी सक्ती खासगी शाळांकडून केली जाते, मात्र शाळा सुरू होऊन १५ दिवस उलटून गेले तरीही दुकानामध्ये बदललेला गणवेशच

पुणे : पालकांनी ठराविक दुकानातूनच विद्यार्थ्यांसाठी गणवेश खरेदी करावी, अशी सक्ती खासगी शाळांकडून केली जाते, मात्र शाळा सुरू होऊन १५ दिवस उलटून गेले तरीही दुकानामध्ये बदललेला गणवेशच मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना घरचे कपडे घालून शाळेत जावे लागत आहे. त्यामुळे पालिकेच्या शाळांमधीलच नाही, तर खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांवरही जुन्याच गणवेशात शाळेत जाण्याची वेळ आली आहे.शाळा सुरू होण्यापूर्वीच पालक आपल्या मुला-मुलींसाठी नवीन गणवेश, स्कूलबॅग, वॉटरबॅग आदी शैक्षणिक साहित्य खरेदी करतात. काही शाळांकडून गणवेश, पुस्तके शाळेतूनच खरेदी करण्याची सक्ती केली जाते. त्यासाठी मनमानी पद्धतीने शुल्कही आकारले जाते. गणवेश बदलला जाणार असल्यास त्याबाबत पालकांना कल्पना दिली जाते. काही शाळांकडून दरवर्षी गणवेश बदलला जातो. परिणामी पालकांवर दरवर्षी नवीन गणवेश खरेदीचा भार पडतो. बदललेला गणवेश ठराविक दुकानातून खरेदी करण्याबाबत सूचना दिली जाते. त्यानुसार पालक गणवेश खरेदी करतात.येरवडा येथील हाऊसिंग बोर्ड परिसरातील एका शाळेने इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचा गणवेश बदलला. गणवेश विक्री करणाऱ्या दुकानदारांना गणवेश बदलाबाबतची कल्पना दिली. बदललेल्या गणवेशाचे सॅम्पल शाळेत लावण्यात आले होते. पालकांनी १० जूनपासून ठराविक दुकानातून गणवेश खरेदी केली होती. मात्र, अचानक दुकानातील गणवेश विक्री थांबविण्यात आली. (प्रतिनिधी)एका वर्गात दोन रंगांचे गणवेशदुकानातून विकल्या जाणाऱ्या शर्टचा रंग फिकट असल्याने ही विक्री थांबविली जात असल्याचे बोलले जात आहे. परिणामी विद्यार्थ्यांना गेल्या वर्षीचे जुने गणवेश घालूनच शाळेत जावे लागत आहे. त्यामुळे एकाच वर्गात दोन वेगवेगळ्या गणवेशातील विद्यार्थी दिसून येत आहेत. येरवडा येथील शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडे जुना आणि नवीन गणवेश नसल्याने त्यांना घरचे कपडे घालून यावे लागत आहे.पालिकेच्या शाळेतील सुमारे १५ हजार विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात आले आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांना आणखी काही दिवस गणवेशासाठी वाट पाहावी लागेल. तसेच येरवडा येथील दुकानात गणवेश विक्री केली जात नसल्यामुळे काही खासगी शाळेतील विद्यार्थ्याना नवीन गणवेशासाठी २० जुलैपर्यंत जुना गणवेश घालून शाळेत जावे लागणार आहे. त्यातही बदललेला गणवेश विकत घेणाऱ्या पालकांना बदलून दिला जाणार का? याबाबतही पालकांमध्ये संभ्रम आहे.