शहरं
Join us  
Trending Stories
1
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
2
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
3
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
4
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
5
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
6
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
7
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
8
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
9
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
10
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
11
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
12
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
13
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
14
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
15
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
16
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
17
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
18
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
19
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
20
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली

अनुकूल ढग नसल्याने विमान आलेच नाही

By admin | Updated: September 18, 2015 02:06 IST

पुण्यातील धरण क्षेत्रात कृत्रिम पाऊस पाडण्याच्या मोहिमेला अजूनही मुहूर्त मिळत नाही. हवाई दलाच्या परवानग्यांचे सोपस्कार पार पडले असले तरी कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी

पुणे : पुण्यातील धरण क्षेत्रात कृत्रिम पाऊस पाडण्याच्या मोहिमेला अजूनही मुहूर्त मिळत नाही. हवाई दलाच्या परवानग्यांचे सोपस्कार पार पडले असले तरी कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी अनुकूल ढग नसल्यामुळे हे विमान आज गुरुवारीही पुण्यात येऊ शकले नाही. ते शुक्रवारी येण्याची शक्यता आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून वर्तविली जात आहे.रात्री उशिरानंतर परवानग्यांचा सोपस्कार पूर्ण झाल्यामुळे गुरुवारी विमान पुण्यात येईल. अशी आशा होती. पण हवामान विभागाने पुण्याच्या धरण क्षेत्रात हा कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी अनुकूल वातावरण नसल्याचा अहवाल संबंधितांना दिल्यामुळेही आज पुण्यात हा प्रयोग राबविता आला नाही़ त्यामुळे विमान उतरविण्यास तांत्रिक परवानगी मिळाली असली तरी हा कृत्रिम पाऊस पाडण्यास निसर्ग जेव्हा अनुकूल असेल तेंव्हाच हा प्रयोग केला जाणार आहे. पुण्याच्या धरण क्षेत्रात म्हणजेच खडकवासला, पानशेत, टेमघर, वरसगाव, भाटघर, डिंभे या धरणासह जिल्ह्यातील छोट्या-मोठया २४ प्रकल्पांमध्ये कृत्रिम पाऊस पाडला जाणार आहे. आता अनुकूल ढग उपलब्ध व्हावेत आणि प्रयोग धरणक्षेत्रात व्हावा, अशी अपेक्षा आहे़