शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

ई-तिकिटिंगचे आॅडिटच नाही

By admin | Updated: September 15, 2014 05:06 IST

पुणे महानगर परिवहन महामंडळाने सुरू केलेल्या ई-तिकिटिंग मशिनच्या वापराचा ठेका एका खासगी कंपनीला दिला होता.

लक्ष्मण मोरे, पुणेपुणे महानगर परिवहन महामंडळाने सुरू केलेल्या ई-तिकिटिंग मशिनच्या वापराचा ठेका एका खासगी कंपनीला दिला होता. या ई-तिकिटिंग मशिनच्या वापराबाबतच्या आणि त्यातून मिळालेल्या उत्पन्नाचे लेखापरीक्षणच करण्यात आलेले नसल्याची माहिती अधिकारात मागविलेल्या माहितीमधून समोर आले आहे. त्याचप्रमाणे ई- तिकिटिंग मशिनच्या वापराबाबतची आणि त्यातील उत्पन्नाची कोणतीही माहिती अभिलेखावर उपलब्ध नसल्याचेही या माहितीमध्ये नमूद करण्यात आले आहे. साधारणपणे २००७ पासून आजतागायत पीएमपी बसेसमध्ये ई- तिकिटिंग मशिनचा वापर सुरू आहे. हे काम वंश इन्फोटेक लिमिटेड या कंपनीला देण्यात आले होते. मार्च २०१० मध्ये या कंपनीशी करारनामा करण्यात आला होता. सुरुवातीला हे काम एमएसएसआयडीसीला देण्यात आले होते. त्यांनी १० लाखांची अनामत रक्कम न भरल्यामुळे, हे काम वंश इन्फोटेकला देण्यात आले. वास्तविक हे काम देत असताना, पुन्हा निविदा मागवून त्याची प्रक्रिया राबविणे आवश्यक होते. दरम्यान, हा सर्व प्रकार सामाजिक कार्यकर्ते वृषभ शिंगवी, निनाद गोस्वामी, योगेश पवळे, मयूर यादव यांनी माहितीच्या अधिकारामध्ये पीएमपीएमएलकडे ई-तिकिटिंग सिस्टिमबाबत माहिती मागविली होती. त्यामध्ये ही माहिती समोर आली. मार्च २०१० मध्ये पीएमपीने वंश इन्क्फोटेकसोबत केलेल्या करारनाम्यानुसार हा करार २००७ ते २०१० या कालावधीसाठी ग्राह्य धरण्यात आला होता. करारनाम्यानुसार ई-तिकिटिंग मशिनच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांचा डाटा अपलोड करण्यासाठी आणि त्याचा हिशेब ठेवण्यासाठीचा मुख्य सर्व्हर पीएमपीएमएलच्या मुख्य इमारतीमध्ये ठेवण्यात येणार होता. त्यासाठी ५०० चौरस फुटांची जागाही देण्यात आली होती. परंतु, हा सर्व्हर पीएमपीच्या इमारतीमध्ये बसविण्यात आलाच नसल्याचेही या माहितीमधून समोर आले आहे. भलत्याच ठिकाणी बसविलेल्या या सर्व्हरमधील माहितीमध्ये फेरफार केला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पीएमपी बसेसच्या फेऱ्यांमध्ये नेमकी किती तिकिटे दिली गेली, किती उत्पन्न आले याची नेमकी माहिती उपलब्ध होणे अवघड होऊन बसल्याचे शिंगवी यांनी सांगितले. सध्या कंपनी जेवढे उत्पन्न दाखविते, तेव्हढेच उत्पन्न पीएमपीकडून ग्राह्य धरले जाते. आतापर्यंत ई-तिकिटिंग मशिनच्या आर्थिक व्यवहारांचे आॅडिटच झालेले नसल्याची माहिती समोर आल्यामुळे, यामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आर्थिक व्यवहारांबाबत कागदपत्रेच उपलब्ध नसल्यामुळे, कंपनीकडून दाखविण्यात येणारे उत्पन्न हे खरे आहे की खोटे, हे कसे तपासणार, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.