शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची नवी खेळी! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
2
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
3
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
4
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
5
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
6
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
7
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
8
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
9
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
10
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
11
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
12
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!
13
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना पैसाच पैसा, धनसंचयात यश; पदोन्नती, गुंतवणुकीत मोठा फायदा!
14
हे रिअल शिंदे आहेत का? भर सभागृहात दुसरीत शिकणाऱ्या मुलीचा पालकांना प्रश्न, नेमके काय घडले?
15
बाळासाहेबांवर निष्ठा नसल्याने राऊतांवर पुस्तक काढण्याची वेळ : एकनाथ शिंदे
16
Ashish Ubale: 'गार्गी'चे दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या, नागपूरमधील रामकृष्ण मठात घेतला गळफास
17
Income Tax Return : 'सहज' आणि 'सुगम' फॉर्म म्हणजे काय? आयटीआर भरण्यापूर्वी जाणून घ्या
18
सेक्स, ड्रग्ज, ब्लॅकमेलिंग...मस्क यांना अडकवण्याचा कट; माजी FBI अधिकाऱ्याचा दावा
19
२७७ प्रवाशांना घेऊन जाणारे मॅक्सिकन नौदलाचे जहाज न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन ब्रीजला धडकले
20
बांगलादेशी तयार कपड्यांना भारतीय बंदरांची दारे बंद, परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाकडून अधिसूचना जारी

सुनावणीदरम्यान ‘तारीख पे तारीख’ नको

By admin | Updated: May 10, 2017 03:44 IST

नयना पुजारी किंवा दर्शना टोंगारे अशा काही घटना आहेत, ज्या गंभीर आणि माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आहेत. अशा केसेसचा

नयना पुजारी किंवा दर्शना टोंगारे अशा काही घटना आहेत, ज्या गंभीर आणि माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आहेत. अशा केसेसचा निकाल जलदगतीनेच लागला पाहिजे. न्यायालयात आरोपीचे दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर सुनावणीला विलंब लागता कामा नये. एकदा सुनावणीला केस घेतली की मग ‘तारीख पे तारीख’ नको, अशा घटना फास्ट ट्रॅक कोर्टातच चालविल्या जायला हव्यात, असे स्पष्ट मत प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. पवार म्हणाल्या, महिला किंवा प्राक्सो अ‍ॅक्टच्या ज्या केसेस आहेत, त्यांच्या सुनावणीला खरेतर इतका वेळ लागत नाही; पण नयना पुजारीची केस याला अपवाद ठरली आहे. त्याची काही कारणे आहेत. त्यामध्ये सुनावणीदरम्यान आरोपी फरार झाला. काही कारणांस्तव उच्च न्यायालयात अर्ज केला गेला म्हणूनदेखील विलंब झाला. कित्येक वेळेला असेही होते, की पोलिसांना तपास करताना धागेदोरे हाती लागत नाहीत. पहिला तपास एका अधिकाऱ्याकडे असतो. विशिष्ट पोलीस स्टेशनच्या हद्दीत तो गुन्हा घडला असेल तर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या माध्यमातून त्याचा तपास सुरू असतो. सर्वोच्च न्यायालयाची ललिताकुमारीची जी केस आहे, त्यात फिर्यादीने तक्रार दिली की ती लगेच नोंदवून घेणे अधिकाऱ्यांवर बंधनकारक आहे, असा निकाल दिला आहे. क्राइम रजिस्टर झाला की मग तपासाला सुरुवात होते. जे काही घडलंय ते, पंचनामे, मटेरिअल्स, साक्षीदारांचे जबाब ही तपासाची पद्धत असते आणि मग दोषारोपत्र न्यायालयात सादर केले जाते. परंतु काही केसेमध्ये सीबीआय किंवा सीआयडीकडे तपास गेला तर हा जो मधला काळ आहे, ज्यात एका अधिकाऱ्याकडून दुसऱ्या मग तिसऱ्या अधिकाऱ्याकडे तपास जातो. यात जो वेळ जातो तो कमी केला पाहिजे. तो लागता कामा नये. अशा गुन्ह्यांचा तपास हा जलदगतीनेच झाला पाहिजे. उदा: हिंजेवाडी प्रकरणात रसिला राजूच्या आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात सादर झालेही आणि केस कोर्टात देखील उभी राहिली. इतक्या झटपट केसचा तपास झाला तर त्या घटनेचे गांभीर्यही राहू शकते. त्याचा जो परिणाम असतो तो तसाच राहतो. त्या काळात या केस चालवून जर निकाल लागला तर आरोपींना शंभर टक्के शिक्षा व्हायला हरकत नसते.खटले जर उशिरापर्यंत चालत राहिले तर त्याचे गांभीर्य फारसे राहत नाही. दोन वर्षांनी साक्षीदार तपासला तर त्याला जसे पाहिले तसे आठवण्याची शक्यता कमी असते. यात ती व्यक्तीही कंटाळून जाते. किती वेळा मी कोर्टात यायचे, अशी त्याची मानसिकता बनते. एफआयआर नोंदविल्यानंतर लवकरात लवकर तपास करून दोषारोपपत्र दाखल करावे, सेशन कमिट करावे आणि ते कमिट झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत ही केस चालवून त्याचा निकाल लागायला हवा. समजा आठवड्यात सोमवारी सेशन कोर्टात ही केस ओपन झाली तर पुढच्या मंगळवारपर्यंत दररोज त्याची सुनावणी होऊन या केसचा निकाल लागला गेला पाहिजे. पण आपल्याकडे केसेसचे प्रमाण वाढत चालले आहे. एकेका पोलीस स्टेशनच्या खूप केसेस असतात, सेशन कोर्टात खूप कामे आहेत. आज जर सेशन कोर्टात केस चालवायची ठरवली तर त्या सेशन न्यायाधीशाने दिलेल्या निर्धारित वेळेत ती केस पूर्ण केलीच पाहिजे. ही जबाबदारी सरकारी आणि बचाव पक्ष दोघांची आहे. प्रत्येक आरोपीचे दोषारोपपत्र दाखल करायला ६0 आणि ९0 दिवसांचा एक कालावधी दिलेला असतो. मात्र आपल्याकडे जामिनासाठी आरोपी अर्ज करतात. तो रद्द झाला तर मग ते उच्च न्यायालयात जातात, यामुळे पण विलंब लागतो. केसला उशीर लागला की साक्षीदार दुसऱ्या शहरात निघून जातात. वैद्यकीय अधिकाऱ्याची बदली होते, त्यांना शोधून आणावे लागते किंवा काही वेळेला तारखा घेतल्या जातात. अशा केसेस फास्ट ट्रॅक कोर्टाकडे पाठविण्याची मागणी होत आहे आणि त्या चालविल्या जातातही. केसेसमध्ये सुनावणीदरम्यान तपास अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून वकिलांना माहिती देणे आवश्यक आहे. मात्र कामामुळे प्रत्येक वेळेला ते उपस्थित राहू शकत नाही. यातच खटल्याला विलंब लागला की साक्षीदारांना आपली साक्ष बदलण्याची संधीही मिळते. या घटनांमध्ये सर्वांत जास्त मानसिक त्रास हा त्या कुटुंबीयांना होतो, त्याची दखल घेतली गेली पाहिजे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.