शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

युवकांसाठीही साहित्य संमेलन हवे

By admin | Updated: October 14, 2015 03:34 IST

जगभरात विखुरलेल्या मराठी लोकांना जोडण्यासाठी प्रवासी भारतीय दिवसाच्या धर्तीवर ‘प्रवासी मराठी दिवस’ साजरा करण्याच्या सूचनेचा पुनरुच्चार करतानाच

पुणे : जगभरात विखुरलेल्या मराठी लोकांना जोडण्यासाठी प्रवासी भारतीय दिवसाच्या धर्तीवर ‘प्रवासी मराठी दिवस’ साजरा करण्याच्या सूचनेचा पुनरुच्चार करतानाच युवा शक्तीला मराठी भाषासंवर्धनाच्या कार्यात जोडण्यासाठी युवा साहित्य संमेलन सुरू करा, अशी सूचना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मंगळवारी केली.जानेवारीत पिंपरी-चिंचवड येथे होत असलेल्या ८९व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे झाले, त्या वेळी ते बोलत होते. ‘एकं सत् विप्रा: बहुधा वदन्ति।’ या वचनाचा आधार घेऊन साहित्यिकांनी विचारस्वातंत्र्य, मतस्वातंत्र्य व श्रद्धास्वातंत्र्याचा आदर करणाऱ्या आपल्या थोर परंपरेचे जतन व संवर्धन केले पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन राज्यपालांनी केले. देशात दिवाळी एकदाच साजरी होते; मात्र महाराष्ट्रात साहित्य संमेलन दिवाळीइतक्याच उत्साहात साजरे होते, हा मराठी भाषेचा गौरव असल्याचे विद्यासागर राव यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवडची ओळख आतापर्यंत औद्योगिक नगरी, सांस्कृतिक नगरी व पेन्शनरांचे शहर अशी होती. साहित्य संमेलनामुळे मात्र शहराची ओळख साहित्यनगरी म्हणून निर्माण होईल, असे मत अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांचे स्वागतपर भाषण झाले, तर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)