शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

...तर ओबीसी आरक्षणासाठी गावागावांत संघर्ष उभा राहीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:10 IST

एल्गार मोर्चा लोकमत न्यूज नेटवर्क बारामती : राज्य सरकारने डिसेंबरपूर्वी ओबीसींच्या आरक्षणाचा इम्पेरिकल डाटा न्यायालयाकडे सादर करणे आवश्यक आहे. ...

एल्गार मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क

बारामती : राज्य सरकारने डिसेंबरपूर्वी ओबीसींच्या आरक्षणाचा इम्पेरिकल डाटा न्यायालयाकडे सादर करणे आवश्यक आहे. डिसेंबरपर्यंत डेटा तयार करा भारतीय जनता पक्ष सरकारचे जाहीरपणे अभिनंदन करेल. मात्र, या कालावधीत डाटा तयार न केल्यास त्याचा अर्थ सरकारच्या मनात काहीतरी काळेबेरे आहे असा होईल. ओबीसी आरक्षण न देता धनदांडग्यांना ओबीसींच्या जागांवर उभं करायचे असे सरकारचे षडयंत्र आहे, असे आम्हाला वाटेल. त्यानंतर गावागावांत, रस्त्यांवर संघर्ष झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा माजी ऊर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी दिला.

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे ओबीसी आरक्षण कृती समितीच्या वतीने प्रशासकीय भवनासमोर एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली. त्यामुळे मोर्चा न होता फक्त सभा घेऊन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना निवेदन देण्यात आले. या सभेच्या अध्यक्षस्थानी माजी ऊर्जामंत्री बावनकुळे उपस्थित होते. बावनकुळे म्हणाले, बारामतीतून ओबीसींचा एल्गार पुकारला गेला आहे. तो महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचेल. राजकारण न करता आम्ही भाजप नेते सरकारच्या मदतीला तयार आहोत. सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे ओबीसींचा डेटा तयार करावा. वेळेत डाटा न्यायालयाकडे सादर करणे आवश्यक आहे, तरच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना राजकीय आरक्षणाचा लाभ मिळेल. मात्र, डाटा सादर न झाल्यास होणाऱ्या निवडणुकांमध्ये ओबीसींचे मोठे नुकसान होणार असल्याचे बावनकुळे म्हणाले.

राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर म्हणाले, एकी नाही हेच राजकारण्यांचे भांडवल आहे. ओबीसींचा अभ्यास नसणारे लोक पंतप्रधानांना भेटायला गेले. जोपर्यंत नेता जन्मणार नाही, तोपर्यंत तुम्ही घडणार नाही. याबद्दल आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. ओबीसींचे आमदार खासदार बनवा, पक्ष तुम्ही ठरवा. रिमोट कंट्रोल हातात देऊ नका, असे जानकर म्हणाले.

यावेळी टी. जी मुंडे, जी.बी गावडे, अविनाश मोटे, ज्ञानेश्वर कौले, बापूराव सोलनकर, मच्छिंद्र टिंगरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आमदार योगेश टिळेकर, माजी आमदार प्रकाश शेंडगे, टी. जी मुंडे, भाजपा आमदार योगेश टिळेकर, अविनाश मोटे, अ‍ॅड जी. बी गावडे, मोहनराव मदने, ज्ञानेश्वर कौले, संदिप चोपडे, सतिश फाळके, पांडुरंग कचरे, डॉ अर्चना पाटील आदी उपस्थित होते. प्रास्ताविक बापूराव सोलनकर यांनी केले. सूत्रसंचालन कुमार देवकाते यांनी,तर आभार सुनील ढोले यांनी मानले.

फोटो- बारामती येथे ओबीसी आरक्षण कृती समितीच्या वतीने प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना निवेदन देण्यात आले.

२९०७२०२१ बारामती-१६