शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

...तर धरणाचा वॉल तोडून पाणी सोडू

By admin | Updated: March 31, 2017 02:42 IST

खेड तालुक्यातील चासकमान धरणातील पाणी तालुक्यातील जनतेच्या हक्काचे आहे. ते तालुक्यातील जनतेला

दावडी : खेड तालुक्यातील चासकमान धरणातील पाणी तालुक्यातील जनतेच्या हक्काचे आहे. ते तालुक्यातील जनतेला टंचाईच्या काळात मिळालेच पाहिजे. जर दोन दिवसांत पाणी सोडण्याचा निर्णय झाला नाही तर चासकमान धरणावर हजारो शेतकऱ्यांना नेऊन हाताने वॉल उघडून पाणी सोडले जाईल, असा इशारा माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी दिला आहे.खेड तालुक्याच्या पूर्व भागातील टाकळकरवाडी, भांबुरवाडी, जऊळके, खरपुडी, निमगाव, दावडी, दौंडकरवाडी, शेलपिंपळगाव या परिसरातुन पुढे शिरुर तालुक्यात जातो. पूर्व भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असूनही चासकमान धरणातून पाणी सोडले जात नाही. त्या पार्श्वभूमीवर आज थेट राजगुरुनगर येथील चासकमान प्रकल्प विभाग ५च्या पाटबंधारे उपअभियांता यांच्या कार्यालयावर थेट मोर्चा काढण्यात आला. या वेळी येथे अधिकारीवर्ग उपस्थित नसल्याने शेतकरी आक्रमक झाले होते. शेतकऱ्यांच्या भावनांची कदर करा अन्यथा त्यांच्या रोषाला सामोरे जा असे आक्रमक होत नाराजी व्यक्त केली.माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली खेड तालुक्यातील पूर्व भागातील चिंचोशी, शेलपिंपळगाव, कोयाळी, काळूस, दावडी निमगाव, खरपुडी, होलेवाडी आदी गावातील शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी ए. ए. कपोले यांच्याशी संपर्क साधून शेतकऱ्यांची बाजू मांडली. या वेळी त्यांनी दोन दिवसांत पाणी सोडण्याचे आश्वासन दिले. पालकमंत्री बापट यांच्याशी चर्चा करून तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी सोडण्याबाबत चर्चा केली जाईल, असे आश्वासन दिले. दोन दिवसांत निणर्य झाला नाही तर पाण्यासाठी तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला.दिलीप मोहिते पाटील म्हणाले, पाण्याअभावी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिके जळू लागली आहेत. अधिकारी याकडे लक्ष देत नाहीत. दोन दिवसांत यावर निर्णय झालाच पाहिजे. तसे न झाल्यास शेतकरी अधिकारीवर्गाला सोडणार नाहीत अशी शेतकऱ्यांनी भूमिका घेतली आहे. सरकार आणि अधिकारीवर्ग खेड तालुक्यातील शेकऱ्यांबाबत दुजाभाव करीत आहे. खेड तालुक्यातील जिथपर्यंत कालवा आहे तिथपर्यंत पाणी सोडलेच पाहिजे. या वेळी जिल्हा परिषद सदस्या निर्मला पानसरे, वैशाली गव्हाणे, कैलास सांडभोर, संतोष गव्हाणे, शिवाजी दरगुडे, भानुदास अमराळे, शंकर माळी, विजय गंगावणे, तुषार निकम, देवराम सातपुते, दत्ता ओंबाळे, शिवाजी दरगुडे, सीताराम गुजर, दत्ता लांडे आदी उपस्थित होते.‘पाणी आमच्या हक्काचे आहे ते आम्हाला मिळालेच पाहिजे’ अशा घोषणा देत आंदोलन केले. या आंदोलनात सहभागी झालेले माजी सैनिक व प्रगतिशील शेतकरी बाजीराव दौंडकर यांनी धरणातून पाणी सोडले नाही तर अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर गळफास घेऊन आत्महत्या करणार, असा इशारा दिला आहे.