शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ४३९ घरांमध्ये झाली चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी बांधण्यात आलेल्या इमारतीमधील ४३९ फ्लॅटमध्ये शिरून चोरट्यांनी चोरी केल्याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी बांधण्यात आलेल्या इमारतीमधील ४३९ फ्लॅटमध्ये शिरून चोरट्यांनी चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हडपसर येथील शिंदेवस्तीत हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी तहसीलदार विकास भालेराव (वय ४७, रा. फुलेनगर) यांनी हडपसर

पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

भालेराव हे तहसीलदार ताबा या पदावर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण व पिंपरी-चिंचवडमध्ये कार्यरत आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने शिंदेवस्ती येथे झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी ४ इमारती बांधल्या आहेत. त्यापैकी २ इमारतींमध्ये ४१२ घरांत लोक राहायला आले आहेत. उरलेल्या दोन इमारती रिकाम्या असून त्याचे प्रवेशद्वार गेट लावून बंद आहेत. इमारत क्रमांक ए विंगमध्ये २३६ फ्लॅट आहेत. त्यापैकी २१५ फ्लॅट व बी विंगमधील २२४ फ्लॅट

अशा एकूण ४३९ फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. या

घरातील नळ, मिक्सर व शॉवर असे तब्बल १ लाख ९ हजार ७५० रुपयांचा माल चोरून नेला. चोरीचा हा प्रकार ४ जून ते २६ ऑगस्ट २०२१ दरम्यान घडला आहे. सुरक्षारक्षक असतानाही चोरट्यांनी इमारतीच्या पाईपलाईनवरुन चढून लॉबीमध्ये प्रवेश केला व तेथून घरांचे कडीकोयडा तोडून बाथरूममधील फिटिंग्स चोरून नेले. घरातील पंखे व अन्य साहित्यांना मात्र हात लावला नाही.

हडपसर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक माने

तपास करीत आहेत़