शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे की सातारा ? ठरणार रविवारी

By admin | Updated: October 14, 2015 03:34 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापाठोपाठ नाट्य संमेलन आयोजनाच्या हालचालींनी वेग घेतला आहे. नाट्य संमेलन आयोजित करण्यात सातारा शाखा प्रबळ दावेदार मानली जात असली

पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापाठोपाठ नाट्य संमेलन आयोजनाच्या हालचालींनी वेग घेतला आहे. नाट्य संमेलन आयोजित करण्यात सातारा शाखा प्रबळ दावेदार मानली जात असली, तरी त्यावर येत्या रविवारी शिक्कामोर्तब होणार आहे. ठाणे शाखाही सध्या शर्यतीत आहे.साधारणत: जानेवारी महिन्यात नाट्य संमेलन भरविले जाते. यंदाचे नाट्य संमेलन भरविण्यासाठी जळगाव, नागपूर, कोल्हापूर, ठाणे आणि सातारा या शाखांनी निमंत्रण दिले आहे. ज्या शाखांनी निमंत्रण दिले आहे, त्या शाखा संमेलन भरविण्यास सक्षम आहेत की नाही, याची पाहणी नाट्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. या संदर्भातील अहवाल नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेकडे पाठविण्यात आला आहे.सध्या ठाणे आणि सातारा या दोन शाखांमध्ये संमेलन भरविण्यात चढाओढ लागली आहे. सातारा शाखेला पुण्यातील दोन पदाधिकाऱ्यांनी नुकतीच भेट दिली आहे. बेळगाव संमेलनाची धामधूम सुरू असताना नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी संमेलनाच्या व्यासपीठावरून राजकीय वक्तव्य करणार नाही, अशी भूमिका पत्रकार परिषदेत मांडल्याने बेळगावातील आयोजकांनी संमेलन रद्द करू, असा पवित्रा घेतला. त्या वेळी मध्यवर्ती शाखेच्या मदतीला सातारा शाखेचे पदाधिकारी धाऊन आले. १५ दिवसांत संमेलन घेऊन दाखवितो, असा विश्वास त्यांनी मध्यवर्ती शाखेच्या पदाधिकाऱ्यांना दिला.त्या वेळी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी आणि कार्यवाह दीपक करंजीकर यांनी पुढल्या वर्षी यजमानपद साताऱ्याला देऊ, असे आश्वासन दिले होते.मराठी भाषक आणि सीमावादाचा प्रश्न नाट्य संमेलनाच्या व्यासपीठावर मांडला जावा, असा आग्रह बेळगावच्या पदाधिकाऱ्यांनी धरला होता; पण स्थानिक प्रशासनानेच नियमांच्या एवढ्या भिंती उभ्या केल्या, की मराठी भाषकांचे सर्व मुद्दे बाजूला ठेवून संमेलन पार पाडावे लागले.चार-पाच वर्षांपासून संमेलन मिळावे, अशी सातारा शाखेची मागणी आहे; पण प्रत्येक वेळी काही ना काही कारणे देऊन संमेलन देण्याचे परिषदेकडून टाळले जात आहे; पण यंदाच्या वर्षी सातारा शाखेकडे पदाधिकाऱ्यांच्या आश्वासनाचे भक्कम पाठबळ आहे. असे असले, तरी ऐन वेळी काय होईल, हे कुणी सांगू शकत नाही.नागपूर शाखेनेही संमेलनाची मागणी केली आहे. मुख्यमंत्री नागपूरचे आहेत; त्यामुळे काही सांगता येत नाही, असे खासगीत काही पदाधिकारी सांगतात. (प्रतिनिधी)