शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे-बारामती एसटी बस जळून खाक

By admin | Updated: May 10, 2015 04:57 IST

मुंबई-पुणे दु्रतगती महामार्गावर येथून जवळच असलेल्या कुणे पुलाजवळ राज्य परिवहन (एसटी) महामंडळाची शिवनेरी बस

लोणावळा : मुंबई-पुणे दु्रतगती महामार्गावर येथून जवळच असलेल्या कुणे पुलाजवळ राज्य परिवहन (एसटी) महामंडळाची शिवनेरी बस शनिवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत खाक झाली. बसमध्ये ४२ प्रवासी होते. दैव बलवत्तर म्हणून सर्व प्रवासी या घटनेतून सुखरूप वाचले.खंडाळा महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे येथून बारामतीला जाणाऱ्या बारामती डेपोच्या बसला ( क्र. एमएच-०७ / सी-७५३८ ) खंडाळा घाट संपल्यानंतर कुणे पुलाजवळ अचानक आग लागली. तेथून जाणाऱ्या एका वाहनाच्या चालकाने बसचालकाला बसला आग लागल्याची माहिती दिली. चालक पी. डी. कवडे व वाहक ए. बी. बुट्टे यांनी प्रसंगावधान राखत याबाबत प्रवाशांना कल्पना देत बस मार्गालगत सर्व्हिस लेनवर उभी केली. नंतर प्रवाशांनी जीव मुठीत घेऊन साहित्याची तमा न करता बसमधून उड्या मारल्या. प्रवाशी खाली उतरल्यानंतर काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. माहिती मिळताच खंडाळा महामार्गाचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार कुळकर्णी, अल्ताफ पठाण, दिलीप कुरंदळे, सुधाकर शिंदे आणि आयआरबीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने आग विझविण्यासाठी आयआरबीच्या अग्निशामक दलाला कळविले. खबरदारी म्हणून तेथील वाहतूक काही काळ रोखण्यात आली. दहा मिनिटांत आयआरबीचा बंब घटनास्थळी दाखल झाला. आग आटोक्यात आल्यानंतर या मार्गावरील वाहतूक दोन लेनवरून सुरू केली. पुन्हा आग विझविण्यासाठी आयआरबी व आयएनएस शिवाजीचे बंब घटनास्थळी दाखल होऊन आग पूर्णपणे विझविली. तोपर्यंत संपूर्ण बससह प्रवाशांचे साहित्य आगीत जळून खाक झाले होते. आग वाढत्या उष्म्याने व वाहन गरम होऊन आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. बसमधील प्रवाशांना चालक व वाहक यांनी महामंडळाच्या इतर प्रवाशी बसमध्ये बसवून दिले. लोणावळा एसटी आगाराचे वाहतूक नियंत्रक व्ही. व्ही. धुमाळ यांनी घटनास्थळी जाऊन घटनेची पाहणी केली. (प्रतिनिधी)