शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

सिरमच्या ‘कोव्होव्हॅक्स’ लसीच्या भारतातील चाचण्या पुढील महिन्यात सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : अमेरिकन कंपनी नोव्हाव्हॅक्स आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांनी विकसित केलेली ‘कोव्होव्हॅक्स’ ही लस ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : अमेरिकन कंपनी नोव्हाव्हॅक्स आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांनी विकसित केलेली ‘कोव्होव्हॅक्स’ ही लस ऑगस्ट महिन्यापर्यंत बाजारात उपलब्ध होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. एप्रिल महिन्यात या लसीच्या मानवी चाचण्यांना भारतात सुरुवात होणार आहे. मानवी चाचण्या सुरू असतानाच लसीचे उत्पादनही सुरू केले जाणार आहे. परवानगी मिळाल्यावर तत्काळ वितरणाला सुरुवात करण्याच्या दृष्टीने सिरम इन्स्टिट्यूटने तयारी केली आहे. ‘गावी’अंतर्गत येणाऱ्या ‘कोव्हॅक्स’ देशांना पुरवाव्या लागणाऱ्या २० कोटी डोसचे अद्याप नियोजन सुरू असल्याचे समजते.

“लसीची परिणामकारकता प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. भारतात या लसीच्या चाचण्या सुरू करण्यासंदर्भात अर्ज करण्यात आला आहे,” अशी माहिती अदर पूनावाला यांनी नुकतीच ट्विट करून दिली. जून २०२१ पर्यंत ‘कोव्होव्हॅक्स’च्या प्रत्यक्ष वापराला सुरुवात होईल, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

नोव्हाव्हॅक्स या अमेरिकी कंपनीच्या कोरोना प्रतिबंधक लसीबाबतचे संशोधन व उत्पादन करण्याबाबत त्या कंपनीने सिरम इन्स्टिट्यूटशी ऑगस्ट २०२० मध्ये करार केला. नोव्हाव्हॅक्स कंपनीच्या लसीचे भारतात उत्पादन करण्याचा विशेष हक्क या कराराद्वारे सिरम इन्स्टिट्यूटला प्राप्त झाला. उच्च मध्यम किंवा उच्च उत्पन्न असलेले देश वगळता अन्य देशांसाठी कोरोना साथीच्या काळात सिरम इन्स्टिट्यूटला नोव्हाव्हॅक्स लसीचे उत्पादन करण्याचा हक्क या कराराद्वारे मिळाला. सर्व परवानग्या मिळून चाचण्या सुरळीत पार पडल्यास कोव्होव्हॅक्स ही भारतात आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळणारी आणखी एक महत्त्वाची लस असेल.

ब्रिटनमध्ये पार पडलेल्या मानवी चाचण्यांमध्ये कोव्होव्हॅक्स लसींची परिणामकारकता ८९.३ टक्के इतकी असल्याचे सिद्ध झाले आहे. यामध्ये १८ ते ८४ या वयोगटातील १५ हजार स्वयंसेवकांवर लसीची चाचणी घेण्यात आली. कोरोनाच्या नवीन स्ट्रेनवरही ही लस प्रभावी असल्याचे विविध संशोधनातून सिद्ध झाले आहे.