शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

परीक्षापध्दतीलाच व्हॉटस अपचे आव्हान

By admin | Updated: May 15, 2014 04:45 IST

पुणे विद्यापीठ : पेपरफुटी झाली सोपी

पुणे विद्यापीठ : पेपरफुटी झाली सोपीपुणे : व्हॉटस ॲपसारख्या सोशल मीडियाचे फायदे अनेक असले तरी यामुळे परीक्षापध्दतीलाच आव्हान निर्माण झाले आहे. फुटलेली प्रश्नपत्रिका हातातल्या मोबाईलमध्ये सेकंदात मिळणे शक्य झाले आहे. पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका काही दिवसांपासून व्हॉटस् ॲप वरून फुटत असल्याचा दावा विद्यार्थ्यांतर्फे केला जात आहे. विद्यापीठाकडेही यासंदर्भातील तोंडी तक्रारी आल्या आहेत.त्यामुळे विद्यार्थ्यांना व्हॉटस् ॲपवर प्रश्नपत्रिका कशा मिळतात हे शोधून विद्यापीठाला त्यावरील उपाय योजना कराव्या लागणार आहेत. त्यासाठी विद्यापीठाला धोरणात्मक व कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत.पुणे विद्यापीठाची व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रमाची प्रथम वर्षाची द्वितीय सत्राची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना पेपरच्या आदल्या दिवशीच मिळाली होती. ही घटना नुकतीच समोर आली असली तरी एमबीएचे पेपर सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना १५ ते २० मिनिटे आगोदरच संबंधित विषयाच्या प्रश्नपत्रिका मिळत होत्या.अशा तक्रारी नाशिक व पुणे जिल्‘ातील काही महाविद्यालयांनी विद्यापीठाकडे केल्या होत्या.परंतु, विद्यापीठ व महाविद्यालयाकडे याबाबतचे कोणतेही पुरावे नसल्यामुळे कार्यवाही करणे विद्यापीठ प्रशासनाला अवघड जात आहे. पेपर सुरू होण्यापूर्वी सुमारे १५ मिनिटे आधी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका मिळू शकतात. हे विद्यापीठ प्रशासनाकडूनही मान्य केले जात आहे.परीक्षा विभागातर्फे संलग्न महाविद्यालयांना ऑनलाईन पध्दतीने प्रश्नपत्रिका पाठविल्या जात आहेत. त्या ओपन करण्यासाठी संबंधित महाविद्यालयातील एक किंवा दोन व्यक्तींना पासवर्ड दिलेला असतो. त्याच व्यक्तींनी पासवर्डच्या माध्यमातून परीक्षा सुरू होण्यापूर्वी एक किंवा पाऊण तास आगोदर प्रश्नपत्रिकांच्या झेरॉक्स काढणे अपेक्षित आहे. याची अंमलबजावणी सर्वच महाविद्यालयांमध्ये काटेकोरपणे होत नाही. त्यामुळेच काही विद्यार्थ्यांना पेपर सुरू होण्यापूर्वी मोबाईलवरून प्रश्नपत्रिका मिळतात,असे विद्यापीठातील अधिकारी सांगत आहेत.महाविद्यालयातूनच फुटते प्रश्नपत्रिका प्रश्नपत्रिका विद्यापीठातून फुटत नाही तर झेरॉक्स काढण्यासाठी एक ते आर्धातास आगोदर महाविद्यालयांना ऑनलाईन पध्दतीने पाठविली जाते. त्या काळात काही महाविद्यालयातून प्रश्नपत्रिकांचा फोटो काढून विद्यार्थ्यांना व्हॉटस् ॲपवरून पाठविल्या जातात. त्यामुळे विद्यापीठाला यातून अंग काढून घेता येणार नाही. परीक्षा सुरू होण्यापूर्वी अर्धा तास आधी विद्यार्थ्यांचे मोबाईल काढून घेणे, तसेच सर्व विद्यार्थी वर्गात बसल्यानंतर महाविद्यालयांना प्रश्नपत्रिका डाऊन लोड करून घेण्यासाठी विद्यापीठाने पासवर्ड पाठवणे,या दृष्टीने विद्यापीठाने विचार केला तरच विद्यार्थ्यांना व्हॉटस ॲप वरून प्रश्नपत्रिका मिळणे बंद होईल, असे मत अधिकार्‍यांकडून व्यक्त केले जात आहे.---