पुणे : सध्याच्या रिक्षा परवाना संख्येच्या २५ टक्के नवे रिक्षा परवाने देणार, असे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी जाहीर केल्याने शहरातील नवीन रिक्षांच्या परवान्यात जवळपास दहा ते बारा हजारांनी वाढ होणार आहे. प्रादेशिक परिवहन विभागाकडून १९९७पर्यंत शहरात ४५ हजार परवाने देण्यात आलेले आहेत. त्यानंतर हे परवाने देणे बंद करण्यात आलेले आहे. नवीन परवाने देण्यास आॅटो रिक्षा चालक-मालक संघटना कृती समितीने विरोध केला असून, या निर्णयामुळे शहरातील रिक्षा परवानाधारकांची संख्या अनावश्यकपणे वाढणार आहे. या शिवाय खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी प्रवासी वाहतुकीत उडी घेतली असताना, रिक्षाची संख्याही वाढल्यास रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती रिक्षा संघटनांकडून व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)
दहा ते बारा हजार नवीन रिक्षा परवाने ?
By admin | Updated: October 1, 2015 00:44 IST