शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

कुसेगाव केंद्रावर मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड

By admin | Updated: February 22, 2017 01:48 IST

तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ६६.३३ टक्के शांततेत मतदान झाले असल्याची माहिती

दौंड : तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ६६.३३ टक्के शांततेत मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रीपती मोरे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विवेक साळुंके यांनी दिली.दरम्यान, कुसेगाव (ता. दौंड) येथे एका मतदान केंद्रावर सायंकाळी पाचच्या सुमारास मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड झाला होता. मात्र या ठिकाणी तातडीने मतदान यंत्र बसविण्यात आले. बहुतांशी मतदान केंद्रांवर साडेपाचला मतदान संपले होते. मात्र कुरंकुभ, कुसेगाव, गार व काही मतदान केंद्रांवर सायंकाळी साडेसातपर्यंत रांगा लागलेल्या होत्या. सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीचा अर्धातास मतदानाचा ओघ बऱ्यापैकी होता. त्यानंतर जसजसे ऊन वाढत गेले तशीतशी मतदारांची संख्या रोडावत गेली. ११ वाजेपर्यंत १४.५ टक्के मतदान झालेले होते. त्यानंतर दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत बहुतांश मतदारकेंद्र मतदारांअभावी ओस पडले होते. सायंकाळी ४ नंतर ऊन ओसरत गेल्याने मतदारांची संख्या वाढत गेली. एकंदरीतच मतदान केंद्राबाहेर मोठ्या मोठ्या रांगा आढळून आल्याने तालुक्यात झालेल्या मतदानाची टक्केवारी लक्षात घेता मतदारांत निरुत्साह असल्याचे जाणवले. राहू (ता. दौंड) येथे चंद्रभागा सोनबा शिंदे या १०४ वयाच्या वयोवृद्धेने मतदानाचा हक्क बजावला. शितोळेवस्ती नं. २ येथील मतदानकेंद्राच्या जवळ पुणे-सोलापूर महामार्गावरील उड्डाणपूल आहे. तेव्हा उन्हापासून संरक्षण मिळावे, म्हणून काही कार्यकर्त्यांनी उड्डाणपूलाच्या बोगद्यात पोलिंग बूथ केला होता. सकाळी बहुतांशी केंद्रांवरील पोलिंग बूथवर कार्यकर्ते वडापाव खाण्यात मग्न असल्याची वस्तुस्थिती होती. (वार्ताहर)