शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीची छेड; आई-भावास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मंचर : शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्यास आईने व भावाने जाब विचारला. त्यांना मारहाण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मंचर : शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्यास आईने व भावाने जाब विचारला. त्यांना मारहाण केल्याची घटना आंबेगाव तालुक्यातील पेठ येथे सोमवारी घडली. याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

किशोर दत्तात्रय रागमहाले असे आरोपीचे नाव आहे. रागमहाले हा एका अल्पवयीन मुलीचा शाळेत जातांना पाठलाग करत होता. तसेच तिला त्रास देऊन रोज तिचा विनयभंग करत होता. रोजच्या त्रासाला कंटाळून हा प्रकार मुलीने शाळेतील शिक्षकांना तसेच आई-वडील, भाऊ यांना सांगितला होता. त्यावेळी रागमहाले याला समज दिली. लॉकडाऊनमध्ये शाळा बंद असल्याने ही मुलगी गावातील क्लासला जात होती. त्यावेळीही किशोर रागमहाले हा नेहमी पाठलाग करून तीच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करत होता. रविवारी सकाळी ही मुलगी घरातून गावात भाजीपाला आणण्यासाठी निघाली होती. वेताळबुवा चौक येथून जात असताना किशोर रागमहाले हा त्याच्या ताब्यातील दुचाकीवरून पाठलाग करत आला. तिला त्रास देत त्याने तिचा विनयभंग केला. मुलगी घाबरून पळत घरी गेली. त्यावेळीही रागमहाले दुचाकीवरून पाठलाग करत तिच्या घराजवळ येऊन थांबला. या मुलीने हा प्रकार घरात जाऊन सांगितला. तिच्या आई आणि भावाने रागमहाले यास विचारणा केली असता त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याठिकाणी असलेले खोऱ्याचे दांडके घेऊन त्याने मुलीचा भाऊ याच्या डाव्या हातावर मारून दुखापत केली. तुम्हाला जिवंत सोडणार नाही. अशी धमकी देऊन तो तिथून निघून गेला. संबंधित अल्पवयीन मुलीने मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी किशोर दत्तात्रय रागमहाले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.