शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविणार

By admin | Updated: January 12, 2017 02:14 IST

प्राथमिक शिक्षण विभागातील केंद्रप्रमुख भरतीसंदर्भात ४०-३०-३० या फॉर्म्युल्यामध्ये दुरुस्ती करून ७० टक्के पदे सरळ सेवेने

राजगुरुनगर : प्राथमिक शिक्षण विभागातील केंद्रप्रमुख भरतीसंदर्भात ४०-३०-३० या फॉर्म्युल्यामध्ये दुरुस्ती करून ७० टक्के पदे सरळ सेवेने, तर ३० टक्के पदोन्नतीने प्राथमिक शिक्षकांमधूनच भरण्यात येतील, असे आश्वासन राज्याचे ग्रामविकास सचिव डॉ. असीम गुप्ता यांनी महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभेच्या शिष्टमंडळाला दिले.मुंबई येथे मंत्रालयामध्ये ग्रामविकास सचिवांच्या दालनामध्ये डॉ. गुप्ता यांच्याशी झालेल्या बैठकीत ही चर्चा झाली. या वेळी मुखेडचे आमदार डॉ. तुषार राठोड, संघटनेचे राज्याध्यक्ष दत्तात्रय सावंत, कार्याध्यक्ष चंद्रकांत दामेकर, सरचिटणीस उमेश गोदे, नांदेड जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी उपस्थित होते.या वेळी झालेल्या चर्चेत सेवेत असलेल्या शिक्षकांसाठी केंद्रपमुख भरतीसाठी वयाची अट रद्द करण्यात येईल, सध्या कार्यरत असलेल्या अभावित केंद्रप्रमुखांना संरक्षण देण्यात येईल. सन २०१४नंतर नियुक्त विषय शिक्षकांना ‘समान काम, समान दाम’ या न्यायाने सहावी ते आठवीच्या विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी देण्यास मान्यता देण्यात आली. बदली प्रक्रियेमध्ये योग्य दुरुस्ती करण्याचे आश्वासन, विद्यार्थिसंख्येनुसार केंद्रप्रमुख पदे तयार करण्यात येतील. केंद्रप्रमुखांना फिरती भत्ता देण्यास तत्त्वत: मान्यता देण्यात आली.या शिष्टमंडळामध्ये सांगलीचे अध्यक्ष ज्ञानदेव भोसले, नांदेडचे अध्यक्ष शंकरराव इंगळे, राज्य सल्लागार विठ्ठल धनाईत, पुणे विभागीय अध्यक्ष सोपानराव धुमाळ, पुणे जिल्हाध्यक्ष अनिल पलांडे, संजय वाघ, शांताराम नेहेरे उपस्थित होते.(वार्ताहर)