शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांची बायोमेट्रिक हजेरी!

By admin | Updated: May 26, 2016 03:36 IST

आयएसओ शाळा ही चळवळ पुढे त्याच गतीने चालू ठेवून गुणवत्तावाढीसाठी भविष्यात शिक्षकांची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने घेण्याचा मानस बुधवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी

पुणे : आयएसओ शाळा ही चळवळ पुढे त्याच गतीने चालू ठेवून गुणवत्तावाढीसाठी भविष्यात शिक्षकांची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने घेण्याचा मानस बुधवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.देसाई यांनी पदभार घेतल्यानंतर ते पहिल्यांदाचा पत्रकारांशी बोलत होते. देसाई म्हणाले, ‘‘आयएसओमुळे शाळांमध्ये बदल होत आहे. यात लोकसहभाग मिळत असल्याने जिल्हा परिषद शाळांचा दर्जा बदलत असून, भौतिक सुधारणाही होत आहेत. गुणवत्तावाढ होत असून पटसंख्या वाढत आहे. यात शिक्षकांचे योगदान आहेच; मात्र आता जिल्हा परिषद शाळांकडे पालकांचा बघाण्याचा दृष्टिकोनही बदलत असून, त्यांच्या अपेक्षांना पुरेपूर उतरण्यासाठी सिस्टीममध्ये थोडा बदल आवश्यक आहे.’’ याचाच एक भाग म्हणून शिक्षकांची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने घेण्याचा विचार आहे. शिक्षक कामावर असूनही गैरहजर असतात, अशा तक्रारी येतात. यावर उपाय म्हणून ही पद्धत लागू करण्याचा विचार आहे. विशेष म्हणजे, ही हजेरी फक्त केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यापुरती मर्यादित न ठेवता सर्वांसाठी खुली करण्यात येणार आहे. वेबसाईटवर आपल्या शाळेतील शिक्षक आज शाळेवर होता की नाही, तो किती वेळ शाळेत होता, हे सर्वांनाच पाहता येईल. यातूनही शिक्षक मार्ग काढू शकतात; मात्र वारंवार दांडी मारणाऱ्या शिक्षकांच्या पगारावरही गदा येऊ शकते, याचाही प्लॅन करण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)विद्यार्थिहित महत्त्वाचे1)सध्या शिक्षकांच्या समानीकरणावरून पेच सुरू आहे. समानीकरणाला संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आहे. याविषयी देसाई म्हणाले, ‘‘शेवटी विद्यार्थ्यांचे हित सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. काही तालुक्यांत रिक्त जागांचे प्रमाण खूप आहे. 2)एक किंवा दोन शिक्षकी शाळांमध्ये तेथील शिक्षक रजेवर गल्यावर शाळा बंद ठेवाव्या लागतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे रिक्त जागांना प्राधान्य दिले जाणार आहे.’’ शिक्षक संघटनांनीही विद्यार्थ्यांचे हित लक्षात घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. रोस्टरनंतर अनुशेष भरणार...सध्या रोस्टर तपासणी सुरू आहे. एका महिनाभरात रोस्टर पूर्र्ण होईल, अशी शक्यता आहे. त्यानंतर अनुशेष किती आहे, यावर भरती करण्याचे ठरविण्यात येईल. रुजू न होणाऱ्या शिक्षकांना नोटीसआपापसातील बदलीने इतर जिल्ह्यांतून आपल्याकडे आलेल्या, मात्र त्या जागेवर रुजू न झालेल्या शिक्षकांना नोटीस काढणार असून ते रुजू न झाल्यास परत त्यांना त्यांच्या जिल्ह्यात पाठवू, असे यापुढे धोरणच ठरविणार असल्याचे देसाई यांनी सांगितले. गेल्या ६ महिन्यांत इतर जिल्ह्यांतून आपल्याकडे आपापसातील बदलीतून आलेल्या शिक्षकांपैैकी ३० शिक्षक अद्याप त्यांच्या जागेवर रुजू झाले नाहीत. हे शिक्षक सुरुवातीला अटी व नियम मान्य करून सोयीने येतात. नंतर पुन्हा आपल्या सोयीच्या जागेनुसार अंशत: बदलासाठी फिरत बसतात. यात विद्यार्थ्यांचे नुकसान होते. त्यामुळे अशा शिक्षकांबाबत धोरण म्हणून निर्णय घेतला जाणार असून जे त्यांना मिळालेल्या जागेवर रुजू होणार नाहीत, त्यांना आम्ही सेवेत दाखल करूनच घेणार नाही.