शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

करवाढ म्हणजे पुणेकरांचा विश्वासघात

By admin | Updated: March 31, 2017 03:02 IST

महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी मिळकत कर व पाणीपट्टीमध्ये प्रस्तावित केलेल्या करवाढीला पदाधिकाऱ्यांनी विरोध

पुणे : महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी मिळकत कर व पाणीपट्टीमध्ये प्रस्तावित केलेल्या करवाढीला पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी हा पुणेकरांचा विश्वासघात असल्याचे म्हटले तर काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी प्रशासन पुणेकरांची फसवणूक करत असल्याची टीका केली आहे. सत्ताधारी भाजपाबरोबर आघाडी असलेल्या रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनीही आयुक्तांवर टीका केली आहे.तुपे म्हणाले, २४ तास पाणी योजनेला मंजूरी दिली गेली, त्यावेळी पहिल्या वर्षी म्हणजे सन २०१६-१७ मध्ये १२ टक्के व नंतर पुढची सलग ३० वर्षे ५ टक्के अशी पाणीपट्टी वाढ होती. त्यालाच मंजूरी मिळाली होती. असे असताना आयुक्तांनी यावर्षी सन २०१७-१८ साठी एकदम १५ टक्के वाढ सुचवली आहे. मिळकत करात वाढ करण्याचा विषयच नव्हता तरीही एकदम १२ टक्के वाढ केली आहे. हा पुणेकरांचा विश्वासघात आहे. सत्ताधारी भाजपाने सत्तेच्या सुरूवातीच्या काळातच तो सुरू केला आहे. आम्ही या करवाढीला विरोध करणार आहोत.अरविंद शिंदे म्हणाले, योजना मंजूर झाली होती त्यावेळी काँग्रेस, शिवसेना व मनसे या तिन्ही पक्षांनी पाणीपट्टी वाढीला विरोध केला होता. मतदारांनी महापालिकेत त्यांना नाकारले याचा अर्थ काय घ्यायचा? ही करवाढ अन्यायकारक आहे, असेच आमचे आजही म्हणणे आहे. पाणीपट्टीत १५ टक्के करवाढ कशाच्या अनुषंगाने केली याचा खुलासा आयुक्तांनी करावा. आम्ही त्यांना तो मागणारच आहोत. पक्षीय स्तरावर या करवाढीवर चर्चा करून आम्ही निर्णय घेऊच, पण आयुक्त एकीकडे आॅनलाइन कर जमा करणाऱ्यांना सवलत देतात, थकबाकीदारांसाठी अभय योजना जाहीर करतात व दुसरीकडे सर्वसामान्य पुणेकरांवर मात्र करवाढीचा बोजा लादतात, हे चुकीचे आहे.(प्रतिनिधी) शहरातील ४२ टक्के लोकसंख्या स्लममध्ये आहे. पाणीपट्टीवाढीचा त्यांना त्रास होणार आहे. त्याचा विचारही न करता आयुक्तांनी मिळकत करातही वाढ केली आहे. ही फसवणूक आहे. पाणीपट्टीवाढीचे जे सूत्र ठरले होते त्याला आयुक्तांनी हरताळ फासला आहे. अत्यंत अयोग्य व अनावश्यक अशी ही करवाढ आहे. त्यांनी मिळकत कराचे मागील वर्षीचे उद्दिष्ट साध्य करता आलेले नाही व ही घट ते करवाढ करून भरून काढत आहेत, हे आम्ही मान्य करणार नाही.- डॉ. सिद्धार्थ धेंडे