शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील टँकरच्या फेऱ्या घटल्या

By admin | Updated: August 18, 2016 06:37 IST

शहराला दररोज एक वेळ पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्यानंतर शहरातील सोसायट्या, उपनगरांमधून येणारी टँकरची मागणी कमी झाली आहे. यामुळे पालिकेच्या नियमित होणाऱ्या

पुणे : शहराला दररोज एक वेळ पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्यानंतर शहरातील सोसायट्या, उपनगरांमधून येणारी टँकरची मागणी कमी झाली आहे. यामुळे पालिकेच्या नियमित होणाऱ्या टँकरच्या फेऱ्यांमध्ये घट झाली आहे.शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मागील वर्षी निम्म्यापेक्षा कमी साठा झाल्याने सप्टेंबर २०१५ पासून शहराच्या पाण्यात ३० टक्क्यांनी कपात करून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. त्यामुळे अनेक सोसायट्यांच्या टाक्यांमध्ये कमी पाणी जमा होत असल्याने त्यांना टँकरवर अवलंबून राहावे लागत होते. उपनगरातील अनेक भागांमध्ये तसेच नगर रोड परिसरात अनेक ठिकाणी पाण्याचा कमी दाबाने पुरवठा होत असल्याने तेथून मोठ्या प्रमाणात टँकरची मागणी येत होती. मे महिन्यात शहराला २० हजार २५४ टँकर लागल्याची नोंद करण्यात आली होती. आॅगस्ट महिन्यामध्ये टँकरची संख्या ५ हजारांपर्यंत खाली आहे.नगररोड परिसरामध्ये पाण्याच्या टाक्यांची संख्या अपुरी असल्याने तेथील अनेक भागांमधून अजूनही टँकरची मागणी सुरू आहे. त्याचबरोबर मोठ्या कंपन्या, हॉटेल यांना टँकरने पुरवठा केला जात आहे. जुलै महिन्यात १५ हजार टँकरच्या फेऱ्या करण्यात आल्या होत्या. जून महिना पूर्ण कोरडा गेला होता. जुलै महिन्यापासून धरणक्षेत्रात पावसाला सुरुवात झाली. धरणे निम्म्यापेक्षा जास्त भरल्यानंतर पाणीकपात रद्द करून दररोज एक वेळ पाणी देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)दररोज पाणीपुरवठा होऊ लागल्यामुळे सोसायट्यांच्या टाक्यांमध्ये पाण्याचा पुरेसा साठा होऊ लागला आहे. दररोज पाणीपुरवठा सुरू व्हावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, काँग्रेस यांना तीव्र आंदोलन उभे केले. त्यानंतर पालकमंत्री गिरीश बापट यांनी कालवा समितीची बैठक बोलावून दररोज पाणीपुरवठा करण्यास संमती दिली.