शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

भिगवण ग्रामपंचायत सरपंचपदी तानाजी वायसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:11 IST

--- भिगवण : भिगवण ग्रामपंचायत सरपंच-उपसरपंचपदाच्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील समर्थक तानाजी अनिल वायसे व उपसरपंचपदी शीतल बाबासाहेब शिंदे यांची ...

---

भिगवण : भिगवण ग्रामपंचायत सरपंच-उपसरपंचपदाच्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील समर्थक तानाजी अनिल वायसे व उपसरपंचपदी शीतल बाबासाहेब शिंदे यांची सर्वांनुमते बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी एस. पी. महानवर यांनी दोन्ही नावांची घोषणा केली.

भिगवण ग्रामपंचायतीची निवडणूक ही अत्यंत चुरशीने लढवली गेली. हर्षवर्धन पाटील समर्थक दिवंगत नेते रमेश जाधव प्रेरित श्रीनाथ ग्रामविकास पॅनलने राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत श्री भैरवनाथ पॅनलला धूळ चारत सतरापैकी सोळा जागांवर विजय मिळवला. भिगवण ग्रामपंचायतीवर एकहाती वर्चस्व स्थापन केले. सरपंच-उपसरपंचपदाच्या निवडणुकीत सर्वसामान्य व शेतकरी कुटुंबातील तानाजी वायसे व शीतल शिंदे यांच्या निवडीमुळे भिगवणकरांनी समाधान व्यक्त केले.

या वेळी पॅनलप्रमुख पराग जाधव, उपसभापती संजय देहाडे, गटनेते संपत बंडगर, तुकाराम भरणे, अशोक शिंदे, अशोक रायसोनी, अजित क्षीरसागर, अभिमन्यू खटके, गुलामभाई शेख, जावेद शेख, खंडेराव गाडे व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. पी. महानवर, सहायक निवडणूक अधिकारी डी. ए. गाडेकर व ग्रामविस्तार अधिकारी डी. बी. परदेशी यांनी काम पाहिले.