शिक्रापूरसह (ता. शिरूर) परिसरातील काही गावांमध्ये कोरोनाबाधितांची वाढती संख्या मोठी असताना अनेक नागरिकांनी मोठा धसका घेतलेला आहे, तर शिक्रापूरमधील रुग्णांची संख्या मोठी असून शिक्रापूर मध्ये १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या महिनाभरात तब्बल १५९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेले आहे. तसेच परिसरातील कोरेगाव भीमा, तळेगाव ढमढेरे, सणसवाडी येथे देखील अनेक रुग्ण आढळून आलेले असल्याने तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने पत्र देऊन विशेष खबरदारीच्या घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या असताना बाजार, दुकाने येथे गर्दी होऊ देऊ नये, सर्वांना मास्कचा वापर बंधनकारक करणे, सामाजिक अंतर पाळणे, जेथे रुग्ण आढळून येतील त्या ठिकाणी जंतूनाशकची फवारणी करणे,ज्या ठिकाणी रुग्ण आढळून येतील त्या रुग्णांना कोविड सेंटर अथवा रुग्णालयात पाठवावे तसेच जे व्यापारी मास्क, सॅनिटायझरचा वापर करणार नाहीत त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश डॉ. घोरपडे यांनी दिले.
कोरोनाबाबत विशेष खबरदारी घ्या : प्रज्ञा घोरपडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:28 IST