शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा मागे घ्या

By admin | Updated: October 11, 2016 01:45 IST

शिरसगाव काटा (ता. शिरूर) येथील माजी सरपंच तसेच जि. प. शाळेचे मुख्याध्यापक यांच्यासह इतरांवर दाखल केलेला खोटा अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा मागे

शिरूर : शिरसगाव काटा (ता. शिरूर) येथील माजी सरपंच तसेच जि. प. शाळेचे मुख्याध्यापक यांच्यासह इतरांवर दाखल केलेला खोटा अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा मागे घ्यावा, या प्रमुख मागणीसह इतर विविध मागण्यांसाठी तालुक्यातील मराठा बांधवांनी सोमवारी शहरात मूक मोर्चा काढला. राज्यातील मोर्चात मराठा बांधवांनी ज्या पद्धतीने शिस्तीचे व एकजुटीचे दर्शन घडविले, त्याच पद्धतीने आजच्या मोर्चातील चित्र दिसून आले.शिरसगाव काटा गावचे माजी सरपंच रामचंद्र केदारी यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, जि. प. शाळेचे मुख्याध्यापक संदीप आढाव, माजी सरपंच भरत चव्हाण, धनश्री चव्हाण यांच्यासह सात जणांविरुद्ध सात आॅक्टोबरला अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात केदारी व त्यांच्या कुटुंबीयांनी पालकसभेत प्रतिविद्यार्थी एका पालकाला प्रवेश असताना सभेच्या ठिकाणी प्रवेश केला. याबाबत मुख्याध्यापक आढाव समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत असताना केदारी यांनी आढाव यांना अरेरावीची भाषा वापरून शिवीगाळ केली. मुख्याध्यापक अपंग तसेच राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षक असल्याने त्यांचा अपमान करू नका, शिवीगाळ करू नका, असे सांगणाऱ्या चव्हाण यांच्या अंगावर केदारी धावून गेले व मारहाण करण्याचा प्रयत्न केला. यानंतर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. प्रकरण मिटवण्यासाठी पैशाची मागणी केली. ही मागणी पूर्ण न झाल्याने केदारी यांनी खोटा अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला असे निवेदनात म्हटले आहे.मोर्चा तहसील कार्यालय येथे आल्यावर तेथे सभेत रूपांतर झाले. राज्यातील मोर्चाप्रमाणेच छोट्या व्यासपीठावर केवळ पाच मुलींनाच बोलण्याची संधी देण्यात आली. ऐश्वर्या रणदिवे, आदिती आढाव, ऋतुजा खोले, खोडदे, प्रेरणा बारवकर यांनीही उपस्थितांना संबोधित केले. तालुक्यातील विविध भागांतून मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात शिक्षकवर्गही होता. इतर समाजाचे बांधवही मोर्चात सहभागी झाले. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार बाबूराव पाचर्णे, माजी आमदार अ‍ॅड. अशोक पवार यांच्यासह विविध पक्षांचे, संस्था, संघटनांचे पदाधिकारी आवर्जून मोर्चात सहभागी झाले. दरम्यान, अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, दौंड उपविभागीय अधिकारी राजेंद्र मोरे, शिरूरचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मराठा समाजाच्या वतीने युवतींच्या हस्ते तहसीलदार राजेंद्र पोळ यांना निवेदन सुपूर्त करण्यात आले व मोर्चाची शांततेत सांगता करण्यात आली. (वार्ताहर)