शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

तन, मन, धन केले अर्पण पांडुरंगचरणी!

By admin | Updated: July 27, 2015 04:03 IST

स्वत:च्या मालकीची कोट्यवधी रुपयांची जमीन पंढरपूर येथील मठाच्या कामासाठी दान करून कलावती शेलार यांनी आपला प्रत्येक श्वास एकप्रकारे पांडुरंगचरणी अर्पण केला आहे.

प्रकाश शेलार,केडगावस्वत:च्या मालकीची कोट्यवधी रुपयांची जमीन पंढरपूर येथील मठाच्या कामासाठी दान करून कलावती शेलार यांनी आपला प्रत्येक श्वास एकप्रकारे पांडुरंगचरणी अर्पण केला आहे.गेल्या १५ वर्षांपासून कलावती गणपत शेलार या संगम (ता. दौंड, जि. पुणे) येथे येणाऱ्या भाविक-पाहुण्यांचे स्वागत हे चहापान व अन्नदान देऊन करतात. त्यांना परिसरात मामी म्हणून ओळखतात. पांडुरंगसेवा व जनसेवा हीच ईश्वरसेवा हे त्यांच्या जीवनाचे तत्त्वज्ञान आहे. शेलार या मूळच्या रांजणगाव सांडस (ता. शिरूर) येथील रहिवासी आहेत. सन १९६४मध्ये त्यांनी संतराज महाराज पालखीसमवेत आषाढी पायी वारीला सुरुवात केली. संस्थानचा मानाचा हंडा सोबत घेऊन सलग ४० वर्षे पायी पंढरीची वारी केली. सन १९८५मध्ये पतीचे निधन झाले. पतीच्या इच्छेप्रमाणे ४ कोटी किमतीची ८ एकर जमीन कलावती यांनी १९९७ मध्ये संतराज देवस्थानला भेट दिली. संतराज देवस्थानने सर्वानुमते व धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या परवानगीने भेट मिळालेली ही शेतजमीन विकली. मिळालेल्या पैशातून पंढरपूर येथे ९ हजार ५०० चौरस फूट आकाराच्या मठाचे व मंगल कार्यालयाचे बांधकाम केले. विशेष म्हणजे शेलार परिवाराने या वास्तूला कुठेही स्वत:चे नाव दिले नाही. पतीच्या निधनानंतर एकट्या पडलेल्या कलावतीमामींनी संगम येथे राहण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून त्या संगमच्या पांडुरंगचरणी सेवा करत आहेत. दररोज या परिसरात काकडा आरती, वीणावादन, पोथीवाचन असा त्यांचा नित्यक्रम आहे. शेजारीच एका छोट्या खोलीमध्ये त्या राहतात. दिवसभर संगम येथे येणाऱ्या-जाणाऱ्या भाविकांची आस्थेने विचारपूस करून भुकेलेल्यांना अन्न व चहापाणी देतात. दिवसभर भटारखाना सुरू असतो. या कामासाठी नंदा बंड ही महिला त्यांना मदत करते. सध्या मामी ८३ वर्षांच्या झाल्या आहेत. गेल्या ८ वर्षांपासून पाय थकल्यामुळे त्या वारीला जात नाहीत; परंतु संगम येथील पांडुरंगाची व भाविकांची सेवा अखंड सुरू आहे.