शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

स्वाइन फ्लूचा तिसरा बळी

By admin | Updated: February 7, 2015 00:55 IST

शहरात शुक्रवारी आणखी एका रुग्णाचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला. नीलेश देशपांडे (वय ३५, रा. तळेगाव दाभाडे) असे मृताचे नाव आहे.

पिंपरी : शहरात शुक्रवारी आणखी एका रुग्णाचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला. नीलेश देशपांडे (वय ३५, रा. तळेगाव दाभाडे) असे मृताचे नाव आहे. थेरगाव येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना २६ जानेवारीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. त्यांचा मृत्यू स्वाईन फ्लूने झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या वर्षात स्वाइन फ्लूमुळे तिसरा बळी गेला आहे.शहरातील पाच जणांना या आजाराची लागण झाली आहे. १८ रुग्णांमध्ये ही लक्षणे दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. एक रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे. सहा जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. १ जानेवारी ते ६ फेब्रुवारी या कालावधीत २४२ संशयित रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली. कृष्णाकुमारी (रा. आंध्र प्रदेश) यांचा मोशी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी मुत्यू झाला. वैद्यकीय तपासणीमध्ये त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे आढळले. यापूर्वी जानेवारी महिन्यात पिंपळे गुरव येथील एकाचा या आजाराने मृत्यू झालेला आहे. तर गतवर्षी या आजाराने चार जणांचा बळी घेतला होता. मृत्यू झालेल्या रुग्णामध्ये दोन रुग्ण पालिका हद्दीबाहेरील आहेत. तर एक रुग्ण पालिका हद्दीतील आहे. (प्रतिनिधी)काय दक्षता घ्यायला हवी४नागरिकांनी हातांची स्वच्छता राखावी४सार्वजनिक ठिकाणी मास्क व अन्य सुरक्षासाधने वापरावीत ४पुरेशी झोप व विश्रांती घ्या४भरपूर पाणी प्यावे४हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करावा.वैद्यकीय विभागातर्फे महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये टॅमीफ्ल्यू औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून दिला आहे. नागरिकांनी याबाबतीत काळजी घेण्याची गरज आहे. वातावरण थंड असल्यामुळे फ्लूचे प्रमाण वाढण्यास मदत होत आहे. पालिकेच्या वतीने सर्व उपाययोजना सुरू आहेत.-डॉ. पवन साळवे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी स्वाइन फ्लूची लक्षणेसर्दी, खोकला, ताप, घसा खवखवणे, अंगदुखी, डोकेदुखी, वांती, जुलाब अशी लक्षणे स्वाईन फ्लूमध्ये दिसून येतात. लागण झाल्यास तत्काळ वैद्यकीय उपचार घ्यावेत.