शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सीबीआयचे अधिकारी असल्याचे सांगून लुबाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:17 IST

पुणे : सीबीआयचे अधिकारी असल्याची बतावणी करून घरात शिरून लॅपटॉप, मोबाईल, बँकेची कागदपत्रे ताब्यात घेऊन ज्येष्ठ नागरिकाचे अपहरण करून ...

पुणे : सीबीआयचे अधिकारी असल्याची बतावणी करून घरात शिरून लॅपटॉप, मोबाईल, बँकेची कागदपत्रे ताब्यात घेऊन ज्येष्ठ नागरिकाचे अपहरण करून त्याला मारहाण करण्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी एका महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी हवेली तालुक्यातील कोरेगाव मूळ गावातील एका ६२ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाने लोणी काळभोर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी यांच्याच इमारतीत राहणारी रेश्मा शेख व एक जण १२ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसहा वाजता त्यांच्या घरात शिरले. आम्ही सीबीआयचे अधिकारी असल्याची त्यांनी बतावणी केली. घरातील लॅपटॉप, मोबाईल, मोटारीचे स्टार्टर, कागदपत्रे व बँकेचे कागदपत्रे असा ३१ हजार रुपयांचा माल घेतला. त्यानंतर त्यांनी फिर्यादी यांना जबरदस्तीने गाडीत बसवून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दमदाटी करून आम्हाला दीड लाख रुपये द्या नाही तर तुमच्यावर खोटी केस करतो. तसेच जीव मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांना खेड शिवापूर येथे सोडून ते पळून गेले. सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करीत आहेत.