शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
3
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
4
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
5
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
6
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
7
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
8
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
9
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
10
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
11
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
12
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
13
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
14
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
15
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
16
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
17
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
18
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
19
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
20
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
Daily Top 2Weekly Top 5

मगर तरणतलाव पुन्हा खुला

By admin | Updated: May 25, 2014 04:54 IST

नेहरुनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडिअम तलावाच्या तळ्यातील व कठड्याच्या फरशा फुटल्याने नागरिक व मुले जखमी होण्याचे प्रमाण वाढले होते.

पिंपरी : नेहरुनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडिअम तलावाच्या तळ्यातील व कठड्याच्या फरशा फुटल्याने नागरिक व मुले जखमी होण्याचे प्रमाण वाढले होते. चार दिवसांच्या किरकोळ दुरुस्तीनंतर पुन्हा तलाव खुला झाला आहे. मात्र, ऐन उन्हाळ्यात तलावास टाळे असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. गेल्या वर्षी तलावाचे मोठ्या प्रमाणात दुरुस्ती काम केले गेले होते. स्थापत्य विभागातर्फे हे काम झाले. मात्र, कामाचा दर्जा सुमार असल्याने अनेक समस्या निर्माण झाले आहेत. तलावाचे तळाचे आणि कठड्याच्या फरशा फुटल्या होत्या. त्याचबरोबर कठड्यावरील झाकण असलेले फरशाही तुटल्या आहेत. यामुळे पोहण्याच्या हात व पायास जखमा होत होत्या. तक्रारीत वाढ झाल्याने तलाव व्यवस्थापकांनी क्रीडा विभागाकडे तक्रार केली. अनेकदा पाठपुरावा केल्यानंतर अखेर गेल्या गुरुवारी किरकोळ दुरस्ती काम करण्यात आले. तळ्यातील तुटलेल्या फरशाच्या जागी सिमेंट लावले आहे. तसेच, कठड्याच्या फरशांची धार कमी करून त्यावर रबर लावण्यात आले आहे. दुरुस्ती काम चार दिवस सुरू होते. त्यामुळे एक साप्ताहिक सुटी व इतर तीन दिवस तलावास टाळे होते. ऐन उन्हाळ्यात तलावाचे बंद असलेले प्रवेशद्वार पाहून नागरिकांना माघारी फिरावे लागले. त्यात अनेकांची गैरसोय झाली. नियमित व पासधारकांनी रोष व्यक्त केला. यामुळे महापालिकेचे दररोजचे उत्पन्नही बुडाले. किरकोळ दुरुस्तीनंतर तलाव खुला झाला असून, पोहण्याचा आनंद नागरिक घेत आहेत. मागील दारातून घुसखोरी तलावाच्या मागील बाजूने असलेले प्रवेशद्वार गंजले आहे. प्रवेश न मिळालेले, तसेच विनातिकीट मुले या फटीतून आतमध्ये प्रवेश करतात. सुरक्षारक्षकांची नजर चूकवून ते सहज प्रवेश मिळवितात. त्यामुळे तलावात १०० पेक्षा अधिक मुले पोहताना दिसतात. ही बाब लक्षात आल्याने तलाव व्यवस्थापकांनी या प्रवेशद्वारास प्लायवूड लावून ते तात्पुरते बंद केले आहे. (प्रतिनिधी)