शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या अनास्थेमुळे स्वारगेट जंक्शन रखडले

By admin | Updated: November 20, 2015 03:28 IST

पीएमपी, बीआरटीपासून ते मेट्रो, मोनोरेल अशा सर्वच सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध असणारे देशातील पहिला इंटर मॉडेल ट्रान्झिट सेंटर (आयएमटीसी) स्वारगेट येथे उभारण्याचा

पुणे : पीएमपी, बीआरटीपासून ते मेट्रो, मोनोरेल अशा सर्वच सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध असणारे देशातील पहिला इंटर मॉडेल ट्रान्झिट सेंटर (आयएमटीसी) स्वारगेट येथे उभारण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने महापालिकेला दिला होता. मात्र, महापालिका प्रशासनाने यासाठी पुढाकार न घेतल्याने हा प्रकल्प रखडला आहे, त्याचवेळी बंगळुरू महापालिकेने अशा प्रकारचा प्रकल्प उभारून बाजी मारली आहे. एसटी बसस्थानक, पीएमपी वर्कशॉपचे डेपो, तसेच अनेक शासकीय कार्यालये आहेत. एसटी बसच्या हजारो फेऱ्या या चौकातून होतात, त्याचबरोबर कात्रज, हडपसर येथून येणारे मुख्य रस्ते या चौकात मिळत असल्याने याठिकाणी वाहतुकीची मोठी वर्दळ असते. याठिकाणची वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी इंटर मॉडेल ट्रान्झिट सेंटर उभारण्याचा प्रस्ताव रस्ते महामंडळाने दिला होता.आयएमटीसी प्रकल्पासाठी ६ हजार कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला होता. तो खर्च खाजगी सहभागातून करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे. या प्रकल्पासाठी महापालिकेबरोबर एसटी महामंडळ, पीएमपी व महापालिकेची जागा लागणार आहे. पुणे महापालिकेने या प्रकल्पातील उडडणपुलाच्या व्यतिरिक्त इतर प्रकल्प करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. या प्रकल्पाचा प्रस्ताव सादर करणाऱ्या महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळाशी महापालिकेने त्यानंतर अद्याप संपर्क साधला नसल्याची माहिती उजेडात आली आहे. स्वारगेट परिसरातील एसटी, पीएमपी, वॉटरपार्कची सर्व २३ एकर जागा ताब्यात घेऊन याठिकाणी वाहतुकीचा एकत्रित आराखडा तयार केला जाणार होता. सध्या स्वारगेट चौकात बांधण्यात येत असलेले उडडणपूल हे देखील याच प्रकल्पाचा एक भाग आहेत. आयएमटीसीचा आराखडयानुसारच सध्या उडडणपुलांची उभारणी केली जात आहे. उडडणपुलाचे काम जानेवारी २०१६ पर्यंत पूर्णत्वास जाणार आहे, मात्र उर्वरित प्रकल्प मात्र रखडला आहे.स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये पहिल्या २० शहरामध्ये समावेश होण्यासाठी पालिकेकडून धडपड केली जात असताना देशातील पहिला स्मार्ट चौक उभारण्याचा मान मात्र पालिकेच्या असहकारामुळे मिळू शकलेले नाही.