मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे चारापिकांना आणि भाताला फायदा होईल. मात्र, बाजरी, भुईमूग आणि बटाटा पिके आता घेता येणार नाहीत, असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. भातलागवडी सुरू झाल्या आहेत. धरणांतील पाणीसाठा वाढत असल्याने शेतकऱ्यांना दिलसा मिळाला आहे.भोर तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे नीरा देवघर धरण ११.५१ टक्के तर भाटघर ८.२२ टक्के भरले आहे. पावसामुळे पिण्याचा व जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.खेड तालुक्यात कालपासून पावसाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. या पावसामुळे चारा पिकांना आणि भाताला फायदा होईल. मात्र, बाजरी, भुईमूग आणि बटाटा पिके आता घेता येणार नाहीत, असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. भातलागवडी पश्चिम पट्ट्यात सुरू झाल्या आहेत. मुळशीच्या पूर्व पट्ट्यात पावसाचा जोर अधिक असल्याने मुळशी-टेमघर धरणातील पाणीपातळी वाढण्याची आशा निर्माण झाली आहे. या भागात ज्या शेतकऱ्यांनी नदीच्या पाण्यावर भातरोपे जगवून ठेवली होती, त्या शेतकऱ्यांनी भातलागवडीस सुरुवात केल्याचे चित्र आहे. दौंड तालुक्याच्या जिरायती भागातील खरीप हंगामाची पावसाअभावी आशा मावळली आहे. परिणामी, या भागात चारा व पाण्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे. तालुक्यात आजपर्यंत २९ मि.मी. पाऊस झाला आहे. तसेच येत्या ४८ तासात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. (प्रतिनिधी)
पावसाची संततधार
By admin | Updated: July 18, 2014 03:45 IST