शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

टाक्यांच्या कामाला स्थगितीच

By admin | Updated: April 28, 2017 06:01 IST

बहुचर्चित असलेल्या २४ तास पाणी योजनेच्या मागील ग्रहण काही सुटण्यास तयार नाही. टाक्यांच्या निविदा प्रकरणातील चौकशी

पुणे : बहुचर्चित असलेल्या २४ तास पाणी योजनेच्या मागील ग्रहण काही सुटण्यास तयार नाही. टाक्यांच्या निविदा प्रकरणातील चौकशी अहवालात आता नगर विकास मंत्रालयाने त्रुटी काढल्या असून त्याचे निराकारण करण्याबाबतचे पत्र मंत्रालयाने महापालिकेला पाठवले आहे. आता त्याचे उत्तर जात नाही तोपर्यंत या योजनेतील टाक्यांच्या कामाला सरकारने दिलेली स्थगिती कायमच राहणार आहे. आयुक्त कुणाल कुमार रजेवर असल्याने त्रुटींचे निराकरण त्यांनी करायचे, की पाणीपुरवठा विभागाने केले तरी चालेल, हाही प्रश्न अनुत्तरीत आहे. २४ तास पाणी योजनेतंर्गत महापालिका प्रशासन शहरात विविध ठिकाणी ८२ पाणी साठवण टाक्या बांधणार आहे. एकूण २३५ कोटी रुपयांच्या या कामाची निविदा प्रसिद्ध करताना त्यात गैरप्रकार झाल, असा आरोप करत आयुक्त कुणाल कुमार यांच्या कामकाजावर शंका घेत आमदार अनंत गाडगीळ व अनिल भोसले यांनी विधान परिषद अधिवेशनात प्रश्न उपस्थित केले होते.त्याची दखल घेत नगर विकास मंत्रालयाने टाक्यांच्या कामाला स्थगिती दिली. त्यामुळे आॅगस्ट २०१६ मध्ये कार्यारंभ आदेश मिळूनही संबधित कंपनीला टाक्यांचे काम अद्याप सुरू करता आलेले नाही. नगर विकास मंत्रालयाने कामाला स्थगिती देताना आयुक्तांनी या निविदा प्रकाराची चौकशी करून अहवाल सादर करावा, असा आदेश दिला. ज्यांच्या कामावर शंका घेतली जात आहे, त्यांच्यावर चौकशी अहवाल तयार करण्याची जबाबदारी दिल्यावरूनही टीका करण्यात आली.आयुक्तांनी त्वरित हा अहवाल तयार करून पाठवला. १२ मार्चला पाठवलेल्या या अहवालावर नगर विकासने काहीच निर्णय घेतला नाही व आता २५ एप्रिलला महापालिकेला त्या अहवालात त्रुटी असल्याबाबतचे पत्र पाठवले आहे. त्यात त्रुटी म्हणून जे काही नमूद करण्यात आले त्याची उत्तरे अहवालात असूनही पुन्हा अशी विचारणा झाल्यामुळे प्रशासनही अचंबित झाले आहे. त्यातच आयुक्त कुणाल कुमार रजेवर आहेत. त्यामुळे आता या त्रुटींबाबत कसे उत्तर द्यायचे, या विचारात प्रशासन आहे. (प्रतिनिधी)