शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
4
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
5
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
6
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
7
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
8
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
9
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
10
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
11
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
12
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
13
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
14
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
15
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
16
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
17
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
18
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
19
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
20
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
Daily Top 2Weekly Top 5

‘जवाहर नेहरू’ योजनेला स्थगिती

By admin | Updated: June 17, 2014 02:17 IST

काँग्रेस आघाडीने देशभरातील शहराच्या विकासासाठी जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजना (जेएनएनयूआरएम) सुरू केली होती

पुणे : काँग्रेस आघाडीने देशभरातील शहराच्या विकासासाठी जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजना (जेएनएनयूआरएम) सुरू केली होती. मात्र, नवीन सरकारने या महत्त्वाकांक्षी योजनेला तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्याचा फटका पुणे शहराला आणि पर्यायाने पुणेकरांनाही बसणार आहे. केंद्र शासनाने शहराच्या विकासासाठी २००५ मध्ये जेएनएनयूआरएम योजना सुरू केली होती. सुमारे एक लाख कोटी रुपयांची योजना दोन टप्प्यांत राबविण्यात येत आहे. देशभरातील पुण्यासह ६२ शहरांचा समावेश योजनेत होता. शहरातील रस्ते, पाणी प्रक्रिया, कचरा व नदी सुधारणाच्या प्रकल्पासाठी कोट्यवधीचा निधी मिळाला. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रातील सत्ता बदलानंतर योजनेला स्थगिती देण्यात आली आहे, असे नगरसेवक आबा बागुल यांनी सांगितले. पुणे महापालिकेला सुमारे ३ हजार कोटींचे प्रकल्प मंजूर झाले आहेत. त्यापैकी १३५० कोटी रुपयांच्या कामांना मान्यता मिळाली आहे. त्यापैकी ७३६ कोटी रुपयांची कामे झाली आहेत. त्यामुळे शहरातील रस्ते, बीआरटी, उड्डाणपूल व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची कामे मार्गी लागली आहेत तर नदी सुधारणेची कामे सुरू आहेत. त्यामध्ये महापालिकेने तब्बल ४०० कोटींचा खर्च केला आहे. भामा आसखेड पाणी प्रकल्प, पर्वती जलशुद्धीकरण, बीआरटी प्रकल्प झाले आहेत तर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प व नदी सुधारणाची कामे सुरू आहेत. या सर्व प्रकल्पांना फटका बसणार आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे ही योजना बंद न करता चालू ठेवण्याची मागणी करणार आहे, असे बागुल यांनी सांगितले.