शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
2
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
3
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
6
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
7
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
10
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
11
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
12
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
13
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
14
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
15
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
16
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
17
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
18
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
19
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
20
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा

उमलत्या मुलांना हेल्पलाईनचा आधार

By admin | Updated: September 28, 2016 04:53 IST

अल्पवयीन मुला-मुलींमध्ये आयुष्याच्या नाजूक वळणावर बरेच शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात. या बदलांशी जुळवून घेताना तात्पुरते आकर्षण, लैंगिक अथवा शारीरिक शोषण

- प्रज्ञा केळकर-सिंग, पुणेअल्पवयीन मुला-मुलींमध्ये आयुष्याच्या नाजूक वळणावर बरेच शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात. या बदलांशी जुळवून घेताना तात्पुरते आकर्षण, लैंगिक अथवा शारीरिक शोषण अशा अनेक समस्या त्यांच्यासमोर आ वासून उभ्या असतात. बऱ्याचदा, भीतीमुळे या समस्यांबाबत मुलांना आई-वडिलांशी संवाद साधता येत नाही. अशा वेळी लहान मुलांसाठी असणाऱ्या हेल्पलाईन उमलत्या फुलांना आधार वाटत आहेत. जाणीव-जागृती कार्यक्रम, शाळांमधील मार्गदर्शक प्रशिक्षण आदी उपक्रमांंमुळे हेल्पलाईनचा लाभ घेणाऱ्या मुलांच्या संख्येतही वाढ झाली आहे. मुस्कान या संस्थेतर्फे बाललैंगिक अत्याचार, बालक संरक्षण कायदा, मुलांचे आणि पालकांचे समुपदेशन आदी विविध विषयांवर काम केले जाते. बऱ्याचदा मुलांना काही समस्यांबाबत अथवा तक्रारींबाबर पालकांशी बोलता येत नसल्याने आपले म्हणणे मांडता यावे, यासाठी ही हेल्पलाईन कार्यरत आहे. याबाबत सांगताना मुस्कान संस्थेच्या प्रकल्प समन्वयक नंदिता अंबिके म्हणाल्या, ‘‘बऱ्याचदा मुलांचे जवळच्या व्यक्ती, कुटुंबीय, समवयस्क आदींकडून लैंगिक शोषण केले जाते. ही घटना अथवा प्रसंगाबाबत पालकांशी बोलताना मुलांना, विशेषत: मुलींना अनामिक भीती वाटते. आई-बाबा आपले शिक्षण बंद करतील, हे भयही त्यांना सतावत असते. अशा वेळी आपले म्हणणे मांडण्यासाठी मुले हेल्पलाईनचा आधार घेऊ शकतात. बऱ्याचदा मुलांप्रमाणेच पालकही या हेल्पलाईनच्या साह्याने तज्ज्ञांशी संपर्क साधू शकतात.’’‘ज्ञानदेवी चाईल्ड लाईन’ संस्थेच्या हेल्पलाईनवरही बालकांशी संबंधित विविध प्रकारच्या तक्रारी नोंदवल्या जातात. शारीरिक शोषण, बालविवाह, बालकामगार, आई-वडिलांशी संबंधित समस्या अशा विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी चाईल्ड लाईनकडे फोन येतात. काही जणांना नाव गुप्त ठेवून मार्गदर्शन हवे असते. बरेचदा, फोन आल्यानंतर मुलांशी प्रत्यक्ष संवाद साधून पुढील प्रक्रिया पार पाडली जाते. सुडाच्या भावनेतून अथवा त्रास देण्याच्या हेतूने खोट्या तक्रारी दाखल केल्या जाऊ नयेत, यासाठी फोन कॉलची वैधता तपासली जाते. गरज भासल्यास, पोलिसांचे सहकार्य अथवा मानसिक समुपदेशन केले जाते. किशोरवयीन मुलांशी संबंधित प्रकरणे नाजूकपणे आंिण संवेदनशीलतेने हाताळली जातात. चाईल्ड लाईन हा केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाचा उपक्रम आहे. काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या शून्य ते १९ वयोगटातील मुला-मुलींकरिता २४ तास कार्यरत असणारी मोफत सेवा आहे. सन २०१४-१५ या वर्षात चाईल्ड लाईनकडे ४१० प्रकरणे व २,३७९ फोन कॉल्स आले. या हेल्पलाईनवर लैंगिक शोषण, व्यसनमुक्ती, बालमजुरी, बालविवाह, बालभिक्षेकरी या समस्यांशी संबंधित तक्रारी नोंदवल्या जात असल्याचे आणि तज्ज्ञांच्या टीमकडून निराकरण केले जात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.प्रकरणांमधील गांभीर्य पाहून संस्थेतर्फे शेल्टरसाठी बालकल्याण समितीची मदतही घेतली जाते. आकर्षणातून निर्माण होणारे प्रेम आणि त्यातून घडणारे गुन्हे अशा प्रकारच्या तक्रारीही हेल्पलाईनवर नोंदवल्या जातात. कोणत्याही तक्रारीचे निवारण करताना मुलांची बाजू शांतपणे ऐकून घेण्यावर जास्त भर दिला जातो.- अनुराधा सहस्रबुद्धे