शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

धाड टाकलेल्या कारखान्यातून नगरसेवकांना तूरडाळीचा पुरवठा

By admin | Updated: November 17, 2015 03:20 IST

पालकमंत्री गिरीश बापट यांनी खालापूर येथील ईटीसी अ‍ॅग्रो कंपनीवर धाड टाकून

पुणे : पालकमंत्री गिरीश बापट यांनी खालापूर येथील ईटीसी अ‍ॅग्रो कंपनीवर धाड टाकून तूरडाळीचा साठा जप्त केला होता. त्याच कंपनीतून भाजपच्या नगरसेवकांना थेट दहा हजार किलो डाळ ९७ रुपये किलोने देण्यात आल्याचे बिलच महापालिकेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी उघडकीस आणले आहे. पालकमंत्र्यांनी धाड टाकायची अन् नगरसेवकांनी ती कमी किमतीमध्ये विकायची, असा अत्यंत चुकीचा प्रकार सुरू असल्याची टीका शिंदे यांनी केली.तूरडाळीच्या किमतीने दोनशे रुपयांचा आकडा ओलांडल्याने सर्वसामान्य जनता महागाईने होरपळून निघाली. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने डाळीवर प्रक्रिया करणाऱ्या कंपन्यांवर धाडी टाकून डाळीचे साठे जप्त केले. त्यामुळे डाळीचा आणखीच तुटवडा निर्माण झाला. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी १०० रुपयांनी तूरडाळ विक्री करणारे स्टॉल लावले. मात्र, या स्टॉलमधून नागरिकांना नेमकी किती डाळ वितरीत करण्यात आली, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर धाड टाकलेल्या कंपनीतून भाजपच्या नगरसेवकांना थेट डाळीचा पुरवठा करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने केला आहे.अरविंद शिंदे यांनी सांगितले, की पालकमंत्री गिरीश बापट यांनी जप्त केलेली डाळ त्यांच्या मतदारसंघामध्ये स्टॉल लावून १०० रुपये किलोने विकली आहे. भाजपचे नगरसेवक अशोक येनपुरे यांच्या नावे ८ नोव्हेंबर रोजी दहा हजार किलो डाळ पाठविण्यात आली. सध्या ग्राहक पेठेला स्वस्त दराने डाळ उपलब्ध करून दिली जात आहे. मात्र, सर्वसामान्य नागरिक ग्राहक पेठेतून डाळीची खरेदी करत नाही, त्यामुळे ती त्यांच्यापर्यंत पोहचण्यात अडचणी येत आहेत.’ईटीसी कंपनीकडून आलेल्या दहा हजार किलो तूरडाळीचे वाटप कार्यकर्त्यांमध्ये करण्यात आले. त्यांनी स्टॉल लावून स्वस्त दराने त्याची विक्री केली आहे. शहरामध्ये आतापर्यंत सव्वा लाख किलो तूरडाळ स्वस्त दरामध्ये विकण्यात आली आहे. -अशोक येनपुरे, नगरसेवक