शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

सणसवाडीत विवाहितेची आत्महत्या, पतीसह पाच जणांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:11 IST

सणसवाडी येथे घरातील छळाला कंटाळून विवाहितेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. चैत्राली योगेश दरेकर असे ...

सणसवाडी येथे घरातील छळाला कंटाळून विवाहितेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. चैत्राली योगेश दरेकर असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे विवाहितेच्या पतीसह पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

योगेश बबुशा दरेकर, कल्पना बबुशा दरेकर, बबुशा विठ्ठल दरेकर, राहुल बबुशा दरेकर, कोमल राहुल दरेकर असे गुन्हे दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत.

सणसवाडी येथील चैत्राली दरेकर या विवाहितेचे २०१६ मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर अनेक दिवस मूलबाळ होत नाही म्हणून तिच्या पतीसह सासरच्या लोकांनी तिचा छळ सुरु केला. याबाबत विवाहितेने वेळोवेळी आपल्या माहेरच्या लोकांना माहिती दिली होती. मात्र तरी सासरच्या लोकांकडून होणारा शारीरिक व मानसिक त्रास असह्य झाल्याने चैत्राली हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत विवाहितेचा भाऊ प्रशांत देविदास लोखंडे (वय २९, रा. मरकळ, ता. खेड, जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण भालेकर हे करत आहेत.