शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

साखरदराची उसळी

By admin | Updated: January 23, 2017 02:42 IST

चालू हंगामात साखर धंद्याला ‘अच्छे दिन’ आले आहेत. चालू एका महिन्यात साखरेने क्विंटलमागे तब्बल ३०५ रुपयांची उसळी

सोमेश्वरनगर : चालू हंगामात साखर धंद्याला ‘अच्छे दिन’ आले आहेत. चालू एका महिन्यात साखरेने क्विंटलमागे तब्बल ३०५ रुपयांची उसळी घेतली आहे. गेल्या चार महिन्यांत साखरेची क्विंटलमागे तब्बल ४०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे चालू हंगामात साखर कारखान्यांनी वाढलेल्या दराच्या पैशाचा उपयोग गेटकेन ऊस मिळविण्यासाठी केला आहे. एकीकडे साखरेला चांगला दर तर दुसरीकडे उसाचा तुटवडा अशा द्विधा मन:स्थितीत कारखाने सापडले होते. त्यामुळे कारखान्यांनी चालू हंगामात एफआरपीपेक्षा टनाला ७०० ते ८०० रुपये देऊन उसाची उपलब्धता केली. उसाची पळवापळवी करण्यावरून अनेक कारखान्यांच्या कामगारांमध्ये हाणामारीसुद्धा झाली होती. दर हंगामात एप्रिल ते मेपर्यंत चालणारे साखर कारखाने यावर्षी डिसेंबरपासूनच बंद होण्यास सुरुवात झाली. राज्यातील निम्म्यापेक्षा अधिक साखर कारखान्यांनी आपला हंगाम उरकला आहे. तर पुणे जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांपैकी आठ कारखान्यांनी आपली धुराडी बंद केली आहेत. हंगाम सुरू होण्यापूर्वी केंद्र सरकारने कारखान्यांना ठरवून दिलेली कोठा पद्धतीचे बंधन हटविले आहे. सध्या साखर खुली झाली असल्याने कारखाने आपआपल्या मर्जीने साखरेची विक्री करत आहेत. साखरेला अजून दर वाढतील म्हणून अनेक कारखान्यांची गेल्या वर्षीचीच साखर पडून आहे. तर चालू हंगामातील नवीन साखर साठा करून ठेवली आहे. त्यामुळे कारखाने आपल्या मर्जीनुसार विक्रीसाठी केवळ ५ ते १० हजार पोतीच ठेवत आहेत. तर दुसरीकडे जे कारखाने साखर साठा करत आहेत अशा कारखान्यांकडे केंद्र सरकार लक्ष ठेवून आहे. जर साखरेचे दर अजून वाढले तर केंद्र सरकार साखर आयात करण्याच्या मानसिकतेमध्ये आहे. मात्र सध्या जागतिक बाजारपेठेतही साखरेचे दर ३७०० रुपये क्विंटलवर गेल्याने साखर आयात करणेही सरकारला परवडणारे नाही. ४० टक्के आयात शुल्क गृहीत धरल्यास साखर भारतात येईपर्यंत ती ४० ते ४२ रुपयांवर जाणार आहे. त्यातच घाऊक बाजारपेठेत साखरेचे दर ४० रुपयांवर गेले आहेत. साखर कारखान्यांची शिखर संघटना असलेल्या इस्मा केंद्र सरकारने साखरेचे दर रोखा अन्यथा टोकाची पावले उचलावी लागतील असा इशारा दिला आहे. (वार्ताहर)