शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाचा पुन्हा फेरा

By admin | Updated: March 29, 2015 00:20 IST

शहर व उपनगराच्या काही भागांमध्ये आज अवकाळी पावसाने हजेरी लावली. मात्र, पावसास जोर नव्हता. त्यामुळे तो काही वेळांतच गायब झाला. आज दिवसभर शहरात ढगाळ हवामान होते.

पुणे : शहर व उपनगराच्या काही भागांमध्ये आज अवकाळी पावसाने हजेरी लावली. मात्र, पावसास जोर नव्हता. त्यामुळे तो काही वेळांतच गायब झाला. आज दिवसभर शहरात ढगाळ हवामान होते.शहरात पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली होती. त्यानुसार आज सकाळपासूनच शहर व उपनगरामध्ये ढगाळ हवामान होते. त्यामुळे पुणेकरांना उकाडा जाणवत होता. दुपारनंतर आकाशात काळ्या ढगांची दाटी झाली आणि चारच्या सुमारास काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने पुणेकरांना थोडा दिलासा मिळाला.पुढील ४८ तासांत शहराच्या काही भागांत गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.चाकण : चाकण व परिसरात आज सायंकाळी सहा वाजता अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावून नागरिक व शेतकऱ्यांची तारांबळ उडवली. खालुंब्रे, निघोजे परिसरात जोरदार गारपीट झाली आहे. तर, खराबवाडी परिसरात झाडे पडल्याचे वृत्त आहे. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने अनेक घरांची छपरे उडवली. मोठमोठी झाडे कोसळून पडली. १५ ते २0 मिनिटांत पाणीच पाणी झाले. गारपिटीमुळे आंब्याच्या कैऱ्यांचे नुकसान झाले. चाकणसह खराबवाडी, नाणेकरवाडी, मेदनकरवाडी, कडाचीवाडी, महाळुंगे, खालुंब्रे, येलवाडी, सांगुर्डी, कान्हेवाडी तर्फे चाकण, सावरदरी, शिंदे, वासुली, भांबोली, वराळे, कोरेगाव, आंबेठाण, बिरदवडी, गोनवडी, बोरदरा, पिंपरी, भाम, कुरुळी, चिंबळी, मोई, निघोजे, वाकी परिसरात पाऊस झाला. (प्रतिनिधी)जमीन भाजणीची कामे खोळंबलीडिंभे : आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात आज पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. मध्यंतरी झालेला अवकाळी पाऊस व आजच्या हलक्या सरींनी वातावरणात गारवा निर्माण झाला असून, जमिनीमधील उष्णता कमी झाल्याने आदिवासी भागातील जमीन भाजणीची कामे खोळंबली आहेत. यामुळे आदिवासी शेतकऱ्यांना जमीन भाजणीच्या कामाची प्रतीक्षा करण्याची वेळ यंदा आदिवासी शेतकऱ्यांवर आली आहे.