शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

उपनगरातील हद्दीवाढीच्या समस्या

By admin | Updated: May 17, 2014 21:47 IST

अर्धवट भागात गटारीची कामे गेल्या कित्येक महिन्यापासून अर्धवट अवस्थेत आहेत. येथील स्मशानभूमीचा रस्त्या अभावी वापर बंद आहे.

————————————————————रस्त्याअभावी स्मशानभूमीचा वापर नाहीमेडद । दि.१७ (वार्ताहर) बारामती शहरात नव्याने समाविष्ट झालेल्या खंडोबानगर भागात वर्ष होऊन विविध कामे प्रलंबित आहेत. अर्धवट भागात गटारीची कामे गेल्या कित्येक महिन्यापासून अर्धवट अवस्थेत आहेत. येथील स्मशानभूमीचा रस्त्या अभावी वापर बंद आहे. या भागातील स्मशानभूमी बांधून ८ ते ९ वर्ष झाले पण रस्ता नसल्याने ती वापराविना धूळ खात पडली आहे. असे अनेक समस्याने या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. वर्षानुवर्ष हेच जीवन अंगवळणी पडलेले हतबल नागरिक नरकातील जीवन जगत आहेत.बारामती नगरपालिकेत गेल्यावर तरी या समस्या सुटतील, असे या भागातील नागरिकांमध्ये वाटत होते. पण आजही भुयारी गटारीची कामे अर्धवट अवस्थेत आहेत. गटारीसाठी खोदलेली चारी गेल्या कित्येक महिन्यापासून न बुजविल्याने त्यात कचरा साठल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याच चारीत डुकरे चरत असल्याने नागरिकांच्या आरोग्याबाबत अवस्था अतिशय दयनिय झाली आहे. भूयारी गटारीची कामे पूर्ण करण्यासाठी दुर्लक्ष करण्यात आले आहे. खंडोबानगर परिसरातील कर्‍हा नदीच्या किनार्‍यावर ८ ते ९ वर्ष होऊन गेली स्मशानभूमी बांधण्यात आली आहे. परंतु, या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने वापराविना पडून आहे. रस्त्याअभावी तिचा वापर अंत्यसंस्कारासाठी करता येत नाही. लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या स्मशानभूमीत मोकाट कुत्री व जनावरांचा वावर असतो. त्यामुळे या भागातील नागरिकांना उघड्यावरच अंत्यविधी करावा लागत आहे. वारंवार तक्रारी करून देखील प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. नगरपालिकेत समाविष्ट झाल्यानंतर देखील हे प्रश्न जैसे थे आहे. स्मशानभूमीच्या सभोवताली कचरा साठला आहे. मोठे खड्डे पडले आहेत. या स्मशानभूमीची स्वच्छता करून लाईट, रस्त्याची व पाण्याची सोय करून द्यावी. अंत्यविधीसाठी होणारी गैरसोय दूर करावी, अशी या परिसरातील नागरिकांची मागणी आहे.—————————————————