शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

बैलगाडा शर्यतीवरून स्टंटबाजी, नियमानुसार कारवाई होणार : अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:12 IST

काहींचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती : आता काही जण बैलगाडा शर्यतीवरून स्टंटबाजी करत आहेत. मागील पाच ...

काहींचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न

उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती : आता काही जण बैलगाडा शर्यतीवरून स्टंटबाजी करत आहेत. मागील पाच वर्षांच्या काळात त्यांचेच सरकार होते. केंद्रातदेखील त्यांचीच सत्ता होती. कोणी त्यांना अडवल नव्हतं. निव्वळ जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. या मुद्द्यांवरून महाविकास आघाडी काही करत नाही, असे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न काहींचा सुरू आहे. कायदा तोडून कोणी स्पर्धा भरवत असेल, तर त्यांच्यावर नियमानुसार कारवाई होणार. आम्हाला सुद्धा स्पर्धा घेता येतात. मात्र, आपणच नियम करायचे आणि आपणच तोडायचे हे आमच्या रक्तात नाही, अशी शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैलगाडा शर्यत मुद्द्यावर आपले मत व्यक्त केले.

बारामती येथे शनिवारी (दि. २१) कोरोना आढावा बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, बैैलगाडा शर्यत सुरू व्हावी, अशीच राज्य शासनाची भूमिका आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार बैैलगाडा शर्यतीवर बंदी आहे. राज्य शासनापेक्षा सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार मोठा आहे. त्यामुळे त्या निर्णयाचे पालन राज्यशासनाला करावे लागते. बैैल हा प्राणी पाळीव प्राणी न गणला जाता वन्यप्राणी म्हणून गणला गेला. हा केंद्र सरकाच्या अखत्यारीतला विषय आहे, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. कोरोना परिस्थिवर बोलताना अजित पवार पुढे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे ७०० मेट्रिक टनापेक्षा जास्त ऑक्सिजन लागल्यास पुन्हा लॉकडाऊन लावावा लागेल. कोरोनाचे सावट दूर व्हावे. तिसरी लाट येऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आम्हाला सुद्धा वाटते नागरिकांनी देवाच्या दर्शनासाठी मंदिरात जावे, मात्र जिथे गर्दी जास्त होते. तेथे कोरोना संक्रमणाची प्रकरणे अधिक आढळून येतात. आषाढी वारी दरम्यान पंढरपूर नजीक पायीवारीला परवानगी देण्यात आली. त्यानंतर पंढरपूरमध्ये कोरोना संक्रमण वाढल्याचेही दिसून आले. पुणे, पिंपरी-चिंचवड आदी भागामध्ये मागील आठवड्यापेक्षा सध्याच्या संक्रमणाच्या प्रमाणात बारामती तालुक्यातील कोरोना संक्रमण कमी झाले नाही. मी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. जीएसटी करामधून ॲम्ब्युलन्सल वगळण्यात आले आहे. त्यामुळे दोन लाख रुपयांनी ॲम्ब्युलन्सची किंमत कमी झाली आहे. त्यामुळे राज्य शासनाने अधिक ५०० ॲम्ब्युलन्स घेतल्या आहेत. वेगवेगळ्या जिल्हा परिषदांमध्ये देखील १४ व्या वित्त आयोगातून ॲम्ब्युलन्स घेण्यात आल्या आहेत. ॲम्ब्युलन्सअभावी कोणत्याही नागरिकाला अडचणीचा सामना करावा लागू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

पवारसाहेबांचा आवाज काढून रेमिडेसिविरची मागणी करणाऱ्यांना अटक केली आहे, कायद्यानुसार त्यांना शिक्षा होईल. अशा पद्धतीने आवाज काढून कोणी फसवत असेल, तर मग तो कोणत्याही पक्षाचा, संघटनेचा, गटा-तटाचा असूद्या त्याचा मुलाहिजा ठेवणार नाही असेही पवार यांनी ठणकावून सांगितले.

राज ठाकरे हा मुद्दा आमच्यासाठी संपला...

उगीच जुन्या कढीला ऊत कशाला आणायचा यासंदर्भात मी बोललो आहे. ज्या लोकांना कुठे थारा राहत नाही ते अशा प्रकारे बोलतात. आमच्यासाठी तो मुद्दा केव्हाच संपला आहे. अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांबाबत

लवकरच बैैठक...

प्रत्येकाला आपला पक्ष संघटना वाढवण्याची मुभा आहे. सध्या राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि शिवसेना मिळून महाविकास अघाडी सरकार चालवत आहोत. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील निवडणुकांच्या बाबतीत वरिष्ठ नेते निर्णय घेतात. मात्र, नगरपालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांबाबत जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना आम्ही अधिकार देणार आहोत. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, जयंत पाटील आणि मी आमची एक बैठक नगरपालिका निवडणुकांपूर्वी होईल, त्यामध्ये एकत्र निवडणुकांबाबत ठरवू.